मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुलावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत राहिला; चायनीज मांज्यामुळे बुलेटस्वार तरुणाचा मृत्यू

पुलावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत राहिला; चायनीज मांज्यामुळे बुलेटस्वार तरुणाचा मृत्यू

सौरभ नावाचा हा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. पुलावर बराच वेळ तो तडफडत पडून होता, वाहनं त्याच्या बाजूने जात होती, मात्र...

सौरभ नावाचा हा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. पुलावर बराच वेळ तो तडफडत पडून होता, वाहनं त्याच्या बाजूने जात होती, मात्र...

सौरभ नावाचा हा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. पुलावर बराच वेळ तो तडफडत पडून होता, वाहनं त्याच्या बाजूने जात होती, मात्र...

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : चाइनीज माज्यामुळे ( Chinese manjya ) एका बाइकस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या 23 वर्षीय तरुणाचं नाव सौरभ दहिया आहे. तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मांज्याने गळा कापल्यानंतर बराच वेळ सौरभ रस्त्यावर तडफडत होता. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ दहिया श्याम वाटिकाजवळील गोपाळ नगरमध्ये राहतो. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि बहिण आहे. बहिणीचं लग्न झालं आहे. सौरभचं ग्रॅज्युएशनपर्यंतच शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यासोबत दिल्ली पोलिसांसह अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. शनिवारी सायंकाळी सौरभ आपल्या बुलेटवरुन कन्हैयानगरमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटायला जात होत. त्याने हेल्मेट घातलं होतं. मंगोलपुरी एलिवेटिड फ्लायओव्हरपर पोहोचला तब्बल साडे 7 च्या दरम्यान एक चायनीज मांजा त्याच्या गळ्यात अडकला. (throbbing of blood on the bridge Bullet rider dies after being bitten by a Chinese manjya )

हे ही वाचा-दरीत कोसळत होती कार...; भारतीय सैन्य दलाने चालकाचा वाचवला जीव, VIDEO VIRAL

दरम्यान तो स्वत:ला सांभाळत असताना बुलेटवरुन खाली पडला. दरम्यान गळ्यावर वार झाले होते आणि खूप रक्त वाहिलं होतं. सौरभ हायवेर तडफडत होता तर त्याच्या शेजारून गाड्या जात होत्या. त्यापैकी काही जणांनी मोबाइलमध्ये काही जणं व्हिडीओ करू लागेल. त्यावेळी गर्दीतील एका महिलेने सौरभच्या मानेभोवती ओढणी दाबून ठेवली आणि रक्त रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान कोणीतरी पोलिसांना कॉल केला, आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पोलिसांनी या प्रकरणात चायनीज मांजा कुठून आला याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. रविवारी आकाशात पंतग दिसत असल्याने फ्लायओव्हरवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.

First published:
top videos

    Tags: Death, Delhi