जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / शेवटचा पेपर देऊन आनंदात बाहेर आली, आईला भेटणार तेवढ्यात मागून युवकानं घातली गोळी; CCTVमध्ये थरार कैद

शेवटचा पेपर देऊन आनंदात बाहेर आली, आईला भेटणार तेवढ्यात मागून युवकानं घातली गोळी; CCTVमध्ये थरार कैद

शेवटचा पेपर देऊन आनंदात बाहेर आली, आईला भेटणार तेवढ्यात मागून युवकानं घातली गोळी; CCTVमध्ये थरार कैद

परीक्षा देऊन तरुणी बाहेर पडली तेव्हा आय -20 कारमधून काही युवक आले, त्यांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. जेव्हा मुलीने गाडीत बसण्यास नकार दिला, तेव्हा आरोपींनी गोळ्या झाडून तिची हत्या केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

फरीदाबाद, 27 ऑक्टोबर : हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यात गुन्हेगारी गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. सोमवारी दिवसाढवळ्या बाइक थांबवली म्हणून काही जणांनी होमगार्डवर गोळीबार केला, तर संध्याकाळी परीक्षा देऊन कॉलेजच्या बाहेर पडलेल्या मुलीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृत मुलीचे नाव निकिता असून ती बीकॉम फायनल इयर्सची विद्यार्थिनी होती. अग्रवाल कॉलेज, बल्लभगड येथे परीक्षा देण्यासाठी निकिता आली होती. निकिता परीक्षा देऊन बाहेर पडली तेव्हा आय -20 कारमधून काही युवक आले, त्यांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. जेव्हा मुलीने गाडीत बसण्यास नकार दिला, तेव्हा आरोपींनी गोळ्या झाडून तिची हत्या केली. वाचा- पुण्यातील लॉजमधील ‘धक्कादायक’ प्रकार पाहून पोलिसही चक्रावले, नंतर घडलं असं… विद्यार्थिनीसोबत शिकत होता आरोपी निकिताच्या वडिलांनी सांगितले की, तौफिक नावाच्या युवकानं निकितासोबत बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. मैत्री करण्यासाठी तो तिच्यावर दबाव आणत होता, मात्र निकितानं त्याला नकार दिला. आरोपींनी वर्ष 2018 मध्ये निकिताचे अपहरणही केले होते, मात्र स्थानिका लोकांनी तडजोड करून तिची सुटका केली. वाचा- गरिबीमुळे भीक मागणाऱ्या बेपत्ता मुलींचा शोध, पोलिसांनी टाकला अपहरण नाट्यावर पडदा पोलिसांनी केला गुन्हा दाखल पोलिसांनी विद्यार्थिनीचा भाऊ नवीन याच्या तक्रारीवरून तौफिकविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवीन म्हणाला की, सोमवारी निकिता कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी गेली होती. आई विजयवती आणि भाऊ नवीन कॉलेजच्या बाहेर तिची वाट पाहात होते. संध्याकाळी 4वाजण्याच्या सुमारास ती परीक्षा देऊन बाहेर आली. तेव्हा एक आय-20 कार कॉलेजच्या गेटजवळ आली आणि निकिताला खेचण्याचा प्रयत्न केला. तौफिकने निकिताची आई आणि भाऊ यांना पाहिले तेव्हा त्याने बॅगमध्ये बंदूक काढून निकितावर गोळ्या झाडल्या. आई आणि भाऊ यांनी लगेचच निकिताला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला त्याला मृत घोषित केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात