जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Crime News : माणूस की राक्षस? पत्नीची क्रूरपणे हत्या, मेंदू चपातीत भरुन खाल्ला, कवटीचा अ‍ॅश ट्रे अन्..

Crime News : माणूस की राक्षस? पत्नीची क्रूरपणे हत्या, मेंदू चपातीत भरुन खाल्ला, कवटीचा अ‍ॅश ट्रे अन्..

माणूस की राक्षस?

माणूस की राक्षस?

Crime News : एका व्यक्तीने आपल्या पत्नीची क्रूर पद्धतीने हत्या केली. मात्र, तो एव्हढ्यावरच थांबला नाही. तर त्याने तिच्या मृतदेहाचा विटंबना केली.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मेक्सिको शहर, 8 जुलै : अलीकडच्या काळात कौटुंबिक वाद, व्यसनं आदी कारणांमुळे गंभीर गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही गुन्ह्यांमागे अंधश्रद्धा हेदेखील प्रमुख कारण असल्याचं दिसून येतं. मेक्सिकोत असाच एक भीषण आणि विचित्र गुन्हा उघडकीस आला आहे. या गुन्ह्यामागे अंधश्रद्धा कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची सैतानाच्या सांगण्यावरून निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली. एका भीषण आणि गंभीर गुन्ह्यामुळे मेक्सिको देश हादरून गेला आहे. तिथल्या एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाची विटंबना केल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. हे कृत्य आपण सैतानाच्या सांगण्यानुसार केल्याचं या व्यक्तीने सांगितले आहे. या प्रकरणास अंधश्रद्धा कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच ही व्यक्ती व्यसनाधीनही होती. त्या व्यक्तीने पत्नीला मारलं. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. तिचा मेंदू खाल्ला आणि अवयवांपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करून तो त्याचा वापर करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. अल्वारो (वय 32) असं आरोपीचं नाव आहे. त्याला 2 जुलै रोजी पुएब्ला इथल्या घरातून पकडण्यात आले. अल्वारो हा बिल्डर होता. त्याच्यावर पत्नी मारिया एलिसियाची 29 जून रोजी निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी व्यसनाधीन झाला होता. तो पत्नीला मारहाण करत असे, असा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. अल्वारो आणि मारियाला 12 ते 23 वर्षांच्या पाच मुली होत्या. ती दोघं सैतानाची पूजा करत आणि त्यासंबंधीच्या पोस्ट सोशल मीडियावरून शेअर करत असत. वाचा - लष्करातल्या जवानाचं घृणास्पद कृत्य, झोपलेल्या बायको अन् मुलांवर घेतला जीवघेणा बद मारियाची हत्या केल्यानंतर अल्वारोनं तिच्या मृतदेहाची विटंबना केली. त्याने पत्नीचा मेंदू टॅकोजमध्ये भरून खाल्ला. टॅकोज हा मेक्सिकोतला प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ चपातीसारखा असतो. त्यात वेगवेगळे पदार्थ भरून खाल्ले जातात. अल्वारो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पत्नीच्या कवटीचा अॅश ट्रे तयार केला. त्यात तो सिगारेटची राख टाकत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्वारोनं हे गुन्हा केला तेव्हा तो नशेत होता. हे कृत्य करण्याचा आदेश सैतानाने दिला असं अल्वारोनं चौकशीदरम्यान सांगितलं. हत्या केल्यानंतर अल्वारोने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवले. यापैकी काही पिशव्या त्याने घराच्या मागच्या बाजूस खड्डा खणून त्यात फेकून दिल्या. एक पिशवी त्याने घरातच ठेवली होती. पत्नी मारियाची हत्या केल्यानंतर अल्वारोने त्याच्या एका मुलीला फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. पीडितेला न्याय मिळावा यासाठी या प्रकरणातले पुरावे जमा करत असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: crime
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात