Home /News /mumbai /

फास्टॅगचं अकाऊंट Unblock करणं पडलं महागात, असा लावला गंडा

फास्टॅगचं अकाऊंट Unblock करणं पडलं महागात, असा लावला गंडा

फास्टॅगचं अकाऊंट (FASTag account)अनब्लॉक करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी फसवणूकीची (Fraud) तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरु आहे.

    मुंबई, 13 जून: फास्टॅगचं अकाऊंट (FASTag account)अनब्लॉक करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. वडाळा येथे राहणारे बाबूराव माडी फास्टॅगचं अकाऊंट अनब्लॉक करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी बँकेच्या अकाऊंटमधून 1.05 लाख गमावले. या प्रकरणी फसवणूकीची (Fraud) तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरु आहे. बाबूराव माडी यांनी आपली कार विकली. कारच्या नव्या मालकानं माडी यांना फोन कार करुन तुम्ही केलेले FASTagचं अकाऊंट ब्लॉक असल्याचं सांगितलं. कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवरुन कॉल आल्याचं नव्या मालकानं माडी यांना सांगितलं. 2 जूनला माडी यांनी बराच शोध घेतल्या एक [9721810878] ऑनलाइन सापडला. जो फास्टॅग कस्टमर केअर (customer care number for FASTag) नंबर म्हणून सेव्ह केला होता. माडी यांनी सांगितलं की, जेव्हा मी नंबरवर कॉल केला. तेव्हा समोरच्या व्यक्तीनं मला सांगितलं की FASTag साठी कनेक्ट असलेल्या तुमच्या बँक खात्याचं KYC अपडेट केलेला नाही आहे. त्यामुळे फास्टॅगचं अकाऊंट अनब्लॉक करण्यासाठी समोरच्यानं मला काही डिटेल्स विचारले, असं माडी यांनी सांगितलं. हेही वाचा- आता याला काय म्हणावं, चक्क बांधलं कोरोना देवीचं मंदिर त्यानंतर दुसऱ्या मोबाईल नंबरवरुन मला एक लिंक आली. ज्यावर एक फॉर्म आणि फास्टॅगचं लेडर हेड होतं. त्यात फोन वर असलेल्या व्यक्तीनं मला क्रेडिट कार्डच्या तपशीलासह सर्व माहिती त्या फॉर्ममध्ये भरण्यास सांगितलं. त्यानंतर एक कोड मोबाईलवर आला. तसंच अकाऊंट अनब्लॉक होण्यास आणखी 24 तास लागतील असं सांगण्यात आल्याचं बाबूराव माडी म्हणालेत. मात्र काहीही बदल झाल्यानं माडी यांनी पुन्हा एकदा कस्टमर केअरला फोन केला. 3 जूनला माडी यांनी पुन्हा फोन लावला. समोरच्या व्यक्तीनं मला अकाऊंट अनब्लॉक होण्यासाठी क्रेडिट कार्ड काम करत नाही आहे असं सांगून माझ्याकडून डेबिट कार्डचे डिटेल्स मागून घेतले. त्यानंतर मी कोड टाकताच माझ्या दोन बँक अकाऊंटमधून 20 हजार आणि 5 हजार असे पैसे गेले. त्यानंतर मी त्या व्यक्तीला याबाबत विचारताच समोर व्यक्ती म्हणाला की, मला माझ्या बँकेशी बोलावं लागेल, असं माडी यांनी सांगितलं. या सर्व प्रकारानंतर माडी एटीएममध्ये गेले आणि त्यांनी मिनी सेंटमेंट काढली. तेव्हा त्यांच्या अकाऊंटमध्ये 25 हजार बँक अकाऊंटमधून काढले होते. त्यांनी बँकेत फोन लावला तेव्हा त्यांना समजलं की, क्रेडिट कार्डमध्ये 75 हजार 975 रुपये खर्च केले होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच माडी यांनी वडाळा पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंडसंहितानुसार कलम 419 ( व्यक्तिरेखेद्वारे फसवणूक), 2020 (फसवणूक) आणि आयटी कायदा 2000 च्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदविण्यात आला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Cyber crime, Mumbai

    पुढील बातम्या