बरैली, 18 फेब्रुवारी : डॉक्टरांच्या घरावर दरोडा टाकल्याचा खळबळजनक खुलासा पोलिसांनी केला आहे. कथित दरोडा आणि खुनाच्या प्रकरणात महिलेची हत्या इतर कोणी नसून डॉक्टर पतीनेच केली होती. घटनेचा खुलासा झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. मेहुणीच्या लग्नाला विरोध केल्याने डॉक्टरने पत्नीचा गळा आवळून खून तर केलाच, पण दरोड्याची घटना घडवून आणण्यासाठी घरातील दागिने गायब करण्याबरोबरच इतर साहित्यही विखुरले होते. तसेच स्वतःवर हल्ला झाला आहे, असे दाखवण्यासाठी त्याने अनेक ठिकाणी ब्लेडने वार केले होते. त्यामुळे पोलिसांनी आरोपी डॉक्टरला रुग्णालयात दाखल केले होते. 14 फेब्रुवारीला झालेल्या हत्येचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी डॉ. फारुख आलम याला अटक केली. तसेच पोलिसांनी आरोपी डॉक्टरच्या सांगण्यावरून लपवलेले दागिने, ब्लेड आणि इंजेक्शन जप्त केले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या बरैलीमधील बिथरी पदारथपूर गावातील आहे. याठिकाणी 13 फेब्रुवारीच्या रात्री डॉक्टरने केवळ आपल्या पत्नीला मारण्यासाठी पेशंट म्हणून आलेल्या दोन डाकूंवर आरोप केला नाही तर स्वत:वर चाकूने हल्ला केल्याचा आरोपही करत पोलिसांची दिशाभूल केली होती. या खून प्रकरणाचा खुलासा झाल्यावर पोलिसांनी आरोपी डॉ.फारूख आलम याला अटक केली आहे. आरोपी डॉक्टरच्या कबुलीजबाबात पोलिसांनी सांगितले की, डॉ. फारुख आलमचे त्याच्या मेहुणीसोबत अवैध संबंध होते आणि त्याला लग्न करायचे होते. हा प्रकार पत्नीला समजताच तिने विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे डॉ.आलमने फिल्मी स्टाईलमध्ये दरोड्याची घटना घडवून पत्नीचा गळा आवळून खून तर केलाच, पण स्वत:ला ब्लेडने कापून लुटल्याची घटना दाखवून पोलिसांची दिशाभूल केली. आरोपी डॉक्टरच्या कबुलीजबाबात पोलिसांनी सांगितले की, डॉ. फारुख आलमचे त्याच्या मेहुणीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. हा प्रकार पत्नीला समजताच तिने विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे डॉ.आलमने फिल्मी स्टाईलमध्ये दरोड्याची घटना घडवून पत्नीचा गळा आवळून खून केला. तसेच स्वत:ला ब्लेडने कापून लुटमारीची घटना दाखवून पोलिसांची दिशाभूल केली. ही घटना पोलिसांना संशयास्पद वाटत होती. त्यामुळे या खुनाचा उलगडा होण्यासाठी पोलिसांनी एकामागून एक चौकशी केली असता धक्कादायक प्रकरण समोर आले. हेही वाचा - लग्नाच्या 6 महिन्यातच पती-पत्नीमध्ये वाद, प्रकरण कोर्टात अन् घडलं भयानक बहीण जिवंत नसती तर… हत्येचा आरोपी डॉ. आलम याने सांगितले की, त्याच्या मेहुणीने त्याला सांगितले होते की, बहीण जिवंत नसती तर तिने लग्न केले असते. मग यानंतर आरोपीने पत्नी नसरीनला सांगितले की तुझे माझ्यावर किती प्रेम आहे? तू हा स्कार्फ तोंडात घालू शकतोस का? मग काय, पतीचे बोलणे ऐकून तिने तोंडात कपडा भरला. याचवेळी पती फारुखने तिचा गळा आवळून खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर खुनाचे दरोड्यात रूपांतर करण्यासाठी घरात ठेवलेले दागिने व पैसे गायब करून ऐवज लंपास केला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.