Home /News /crime /

रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या वृद्धांना पोलिसाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण; एकाचा मृत्यू

रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या वृद्धांना पोलिसाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण; एकाचा मृत्यू

रेल्वे स्टेशनवर दोन गरीब वृद्ध झोपले होते. त्यावेळी RPF हेड कॉन्स्टेबल तेथे आला व त्यांनी जबर मारहाण केली.

    जयपूर, 22 जानेवारी : RPF हेड कॉन्स्टेबलला दोन वयस्कांचं रेल्वे स्टेशनवर झोपण्याचा इतका राग आला की, त्याने त्यांना मारहाण केली आणि शिव्याही दिला. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ (Shocking Video) नागौरच्या मकराना रेल्वे स्टेशनचा आहे. RPF हेड कॉन्स्टेबल राम प्रतापने स्टेशनवरच झोपलेल्या दोन वृद्धांना खूप मारहाण केली. त्यापैकी एकाचा मृतदेह रेल्वे स्टेशनच्या प्रवासी प्रतीक्षा खोलीत सापडला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. वयस्कचा मृत्यू मारहाणीमुळे झाला नसल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. हा व्हिडीओ दोन ते तीन दिवस जुना असल्याचं सांगितलं जात आहे. मकराने रेल्वे स्टेशनवर दोन वृद्ध झोपले होते. त्यावेळी RPF हेड ​​​​​​​कॉन्स्टेबल रामप्रताप आले आणि झोपलेल्या वृद्धांना मारहाण करू लागले. हेड कॉन्स्टेबल सतत त्यांच्या तोंडावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत होते. लोकांना अडवलं तरी त्यांनी ऐकलं नाही. यानंतर खेचत त्यांना स्टेशनच्या बाहेर सोडलं. हे ही वाचा-मरेपर्यंत गोळ्या झाडत राहिले; रेप पीडितेच्या वडिलांना सोशल मीडियावरुन पाठिंबा GRP रीडर किशन सिंह यांनी सांगितलं की, मकराना रेल्वे स्टेशनच्या प्रवासी प्रतीक्षा खोलीत एका वृद्ध भिकाऱ्याचा मृतदेह सापडला आहे. प्राथमिक तपासात वृद्धाचं नाव अब्दुल अजीज असल्याचं समोर आलं आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Rajasthan, Shocking video viral

    पुढील बातम्या