Home /News /crime /

मरेपर्यंत गोळ्या झाडत राहिले; बलात्कार पीडितेच्या वडिलांना सोशल मीडियावरुन पाठिंबा

मरेपर्यंत गोळ्या झाडत राहिले; बलात्कार पीडितेच्या वडिलांना सोशल मीडियावरुन पाठिंबा

बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांनी कोर्टाच्या गेटसमोर आरोपीची हत्या केली.

    पाटना, 22 जानेवारी : गोरखपुरमध्ये (Uttar Pradesh News) शुक्रवारी बलात्कार (Rape) आणि पॉक्सोचा आरोपी दिलशाद याची कोर्टाच्या गेटसमोर पीडित मुलीच्या वडिलांनी गोळी घालून हत्या (Murder) केली. दिलशादमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागल्याचं त्यांनी सांगितलं. यासर्व त्रासामुळे एकदा तर त्यांनी दोन्ही मुलं आणि पत्नीसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बदनामी मुळापासून संपवण्याचा विचार करीत त्यांनी पीडितेवर बलात्कार करणाऱ्याची हत्या केली, असं त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर आरोपी वडिलांना पाठिंबा.. या घटनेनंतर आरोपी वडिलांना पाठिंबा दिला जात आहे. सोशल मीडियावर लोक या घटनेनंतर व्यक्त होत आहेत. आणि न्यायासाठी पीडित मुलीच्या बापाने स्वत: त्याची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे. गेल्याच महिन्यात हत्येचा होता प्लान.. पीडित मुलीचे वडील दिलशाद याची गेल्याच महिन्यात हत्या करण्याचा प्लान होता. मात्र त्यावेळी तो एकटा नव्हता. मात्र काही लोकांसह आला होता. त्यामुळे तेव्हा तो त्याची हत्या करू शकला नाही. दिलशाद जामीनावर सुटल्यानंतर मुलीच्या वडिलांना त्रास देत होता. तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होता, याशिवाय नातेवाईकांना त्याची मुलीसोबत लग्नासह इतर फोटो शेअर करीत होता. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणं कठीण झालं होतं. दुसरीकडे मुलीचे वडील BSF मध्ये तैनात होते. त्यांच्या घरा समोरच दिलशादचं दुकान होतं. त्यानंतर त्याचं घरी येणं-जाणं सुरू झालं होतं. हिंदू नाव सांगून त्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. दोन वर्षांपूर्वी वडिलांच्या हे लक्षात आले. त्यानंतर तो मुलीला घेऊन पळाला. हे ही वाचा-Mumbai च्या आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीसाठी झाली होती अटक त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यातही त्याला जामीन मिळाल्याने त्यांच्या डोक्यात राग होता. त्यातूनच त्यांनी दिलशादची हत्या केली. मरेपर्यंत ते त्याच्यावर गोळ्या झाडत राहिले.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Murder, Rape, Uttar pradesh

    पुढील बातम्या