जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / खरेंच्या गर्ल्स हॉस्टेलमधील बाथरूमच्या शॉवरमध्ये स्पाय कॅमेरा; काकांचा कम्प्यूटर तपासताच मुली हादरल्या!

खरेंच्या गर्ल्स हॉस्टेलमधील बाथरूमच्या शॉवरमध्ये स्पाय कॅमेरा; काकांचा कम्प्यूटर तपासताच मुली हादरल्या!

खरेंच्या गर्ल्स हॉस्टेलमधील बाथरूमच्या शॉवरमध्ये स्पाय कॅमेरा; काकांचा कम्प्यूटर तपासताच मुली हादरल्या!

आशिष खरेंच्या कम्प्यूटरमधील एका फोल्डरमध्ये मुलींचे अश्लील Video पाहून पोलिसांनी संताप व्यक्त केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 3 जून : संगम नगरी प्रयागराजमध्ये (Uttar Pradesh News) एका गर्ल्स हॉस्टलच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमरा सापडल्यानंतर खळबळ उडाली. मुलींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी स्पाइ कॅमेरा काढला आणि हॉस्टेल संचालकालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांना पकडलेल्या व्यक्तीच्या कम्प्यूटरमधून मुलींचे व्हिडीओ सापडले आहेत. या प्रकरणात हॉस्टेल संचालकाविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. ही धक्कादायक घटना प्रयागराजमधील कर्नलगंज भागातील मेयोहाल चौकाजवळ घडली. येथे राहणाऱ्या आशिष खरे नावाच्या व्यक्तीने आपल्या घराच्या वरीच मजल्यावरील खोल्या मुलींना राहणाऱ्यासाठी हॉस्टेल स्वरुपात दिल्या होत्या. या खोल्यांमध्ये अनेक मुली राहत होत्या. आशिष खरेवर आरोप आहे की, त्याने बाथरूमच्या शॉवरमध्ये एक गुप्त कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेलं फुटेज तो आपल्या कम्प्यूटरवर सेव्ह करीत होता. पोलिसांनी स्पाय कॅमेऱ्यासह कम्प्यूटर आणि त्याची हार्डडिस्कदेखील ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी सांगितलं की, बाथरूमच्या शॉवरमध्ये कॅमेरा अशा पद्धतीने लावण्यात आला होता, जो सहजपणे दिसू शकत नव्हता. याची वायरिंगदेखील पाण्याच्या पाईपमधून केली होती. या खळबळजनक घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी हॉस्टेल संचालक आशिष खरे याला तेथे राहणाऱ्या मुली काका म्हणत होत्या. मात्र हा नराधम त्यांचे अश्लिल व्हिडीओ रेकॉर्ड करून ते सेव्ह करीत होता. या व्हिडीओ क्लिप्सच्या साहाय्याने तो मुलींना ब्लॅकमेल करू शकला असतो. किंवा हे व्हिडीओ पॉर्न साइटवर विकून मुलींचे आयुष्य धोक्यात घालू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात