हैदराबाद, 3 जून : देशात अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यानंतर आता तेलंगणा (Telangana) राज्यातील हैदराबाद ( Hyderabad) येथून एक धक्कादायक घटना घडली. पबमध्ये भेटलेल्या विद्यार्थ्यांनी कारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape in Car) केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे घटना - एक अल्पवयीन मुलगी पार्टीसाठी पबमध्ये गेली होती. त्याचदिवशी म्हणजे शनिवारी कारमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या दुष्कृत्यामध्ये एका आमदाराचा मुलगा सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व विद्यार्थी इयत्ता 11वी आणि 12 वीचे आहेत. ते राजकीयदृष्ट्या प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी संध्याकाळी 17 वर्षीय तरुणी मित्रासोबत पबमध्ये गेली होती. मात्र, ती तेथून लवकर निघून गेली. याचवेळी अल्पवयीन मुलीने एका मुलाशी मैत्री केली. यानंतर या मुलीने आपला नवीन मित्र आणि त्याने त्याच्या मित्रांसह क्लब सोडला. यानंतर त्यांनी तिला घरी सोडण्याचे आश्वासन दिले होते. बाकीच्यांनी दिला कारबाहेर पहारा - मात्र, हैदराबाद शहरातील ज्युबली हिल्स (Jubilee Hills) परिसरात पाच मुलांनी कार पार्क केली आणि या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. बलात्काराची घटना होत असताना इतर विद्यार्थी कारच्या बाहेर पहारा देत होते. या प्रकरणात एका आमदाराच्या मुलाचे नाव समोर आले आहे. त्याने सामूहिक बलात्कार केला. यानंतर तो आणि त्याचे मित्र गाडीतून उतरून पळून गेले. हेही वाचा - Dhule Crime : पत्नीचे चुलत सासऱ्यासोबत अनैतिक संबंध, पतीला कळल्यावर त्याने उचललं टोकाचं पाऊल
मुलीच्या वडिलांना दिसल्या खुणा -
या घटनेनंतर पीडित मुलगी हादरुन गेली होती. तिच्या वडिलांनी तिच्या घरी पोहोचल्यावर तिच्या मानेवर जखमा पाहिल्या. यावेळी तिला त्याबद्दल विचारले. यानंतर तिने, पबमध्ये एका पार्टीनंतर काही मुलांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.