जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / तिकीट तपासणाऱ्या टीटीईलाच रेल्वेतून खाली फेकण्याची धमकी, पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

तिकीट तपासणाऱ्या टीटीईलाच रेल्वेतून खाली फेकण्याची धमकी, पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

एका पोलिसाला टीटीईने तिकीट मागितलं तेव्हा त्याने टीटीईला गाडीतून खाली फेकून देण्याची धमकी दिली.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    लखनौ, 14 मार्च : ट्रेनच्या प्रवासात अनेक गमतीजमती घडतात. काही वेळेला वाद-भांडणंही होतात. आता मोबाईल आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे अशा गोष्टी सहज सोशल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या पोलिसांना जेव्हा एका वयस्कर टीटीईनं तिकीट मागितलं, तेव्हा त्या पोलिसांनी चक्क टीटीईला गाडीतून खाली फेकून देण्याची धमकी दिली. मात्र टीटीईनं न घाबरता त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांनी टीटीईचं खूप कौतुक केलं आहे.

    जाहिरात

    ट्विटर यूजर मोहम्मद इमरान (@ImranTG1) यांनी 13 मार्चला त्यांच्या अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 27 हजार 800 व्ह्यूज मिळाले आहेत, तर 600 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ 1.37 सेकंदांचा आहे. ट्रेनमधील टीटीई अधिकारी आणि पोलीस यांच्यातल्या वादाचा हा व्हिडिओ आहे. टीटीई म्हणजे तिकीट तपासणाऱ्या अधिकाऱ्यानं जेव्हा पोलिसांना तिकीट दाखवायला सांगितलं तेव्हा त्यांनी त्याला नकार दिला. खरं तर ते विनातिकीट प्रवास करत होते. मात्र त्यांनी उलट टीटीईवरच आवाज चढवला. हा टीटीई वयस्कर होता म्हणजे त्याची रिटायरमेंट जवळ आली असावी असं व्हिडिओवरून वाटतंय. मात्र ज्येष्ठ टीटीई अधिकाऱ्यानीही न घाबरता त्यांच्यावर आवाज चढवत पोलिसांना गप्प बसायला सांगितलं. यावर त्या पोलीस अधिकाऱ्यानं टीटीईला गाडीतून खाली फेकून देण्याची धमकी दिली. ही तुमच्या बापाची गाडी आहे का?, असा उद्धट सवाल पोलिसांनी टीटीईला केला. हे व्हिडिओत दिसत आहे. यावर तिकीट पाहणं माझं कर्तव्य असतल्याचं त्या टीटीई अधिकाऱ्यानं सांगितलं. उद्धटाला उद्धट उत्तर देताना टीटीईनेही त्या पोलिसाला प्रतिसवाल केला रेल्वे माझ्या बापाची नसली तर तुझ्या बापाची आहे का? अर्थात टीटीई बरोबर काम करतोय हे पाहून बाजूची मंडळीही त्याला पाठिंबा देत असल्याचं व्हिडिओत दिसतंय. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ प्रवाशांनी मोबाईलमध्ये शूट केलाय. आता हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. हा व्हिडिओ कधी शूट केलाय, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही, मात्र तो उत्तर प्रदेशमधला असल्याचं समजतंय. वाचा - पालघर: औषधे घेण्यासाठी जात असतानाच उचललं, अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य या व्हिडिओमध्ये टीटीईनं दाखवलेल्या धाडसाचं आणि त्यांच्या कामावरील निष्ठेचं अनेकांनी कौतुक केलंय. ट्रेनमध्ये हे अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. काही पोलीस कर्मचारी संपूर्ण पोलीस यंत्रणेचं नाव खराब करतात, असं गोपाल सिंह नावाच्या एका युजरनं लिहिलंय. मुखिया नावाच्या एका युजरनं म्हटलंय की बहुधा पोलिसांना पगार कमी मिळत असावा. त्यामुळेच ते विनातिकीट प्रवास करताहेत. इतर काही युजर्सनी टीटीई अधिकाऱ्याचं कौतुक केलंय. दीपक कुमार झा नावाच्या एका युजरनं हा व्हिडिओ शेअर करत रेल्वे मंत्रालयाला टॅग केलंय. त्यावर मंत्रालयानं संबंधित विभागाकडे चौकशीसाठी प्रकरण सोपवल्याचं म्हटलंय.

    News18लोकमत
    News18लोकमत

    विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा रेल्वेला मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र पोलीसच असं वागू लागले, तर इतरांना शिक्षा कोण करणार असा प्रश्न उपस्थित होतोय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: crime , train
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात