मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'त्याने श्रद्धाचे 35 तुकडे केले, मी तुझे 70 करीन..' धुळ्यातील तरुणाने गर्लफ्रेंडला दिली धमकी, अन् मग...

'त्याने श्रद्धाचे 35 तुकडे केले, मी तुझे 70 करीन..' धुळ्यातील तरुणाने गर्लफ्रेंडला दिली धमकी, अन् मग...

एका तरुणाने आपल्या लिव्ह इन पार्टनरला श्रद्धा हत्याकांडाचं उदाहरण देत धमकी दिली आहे. 'त्याने श्रद्धाचे 35 तुकडे केले..पण मी तुझे 70 तुकडे करीन' अशी धमकी या व्यक्तीने दिल्याचा आरोप आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Dhule, India
  • Published by:  Kiran Pharate

धुळे 03 डिसेंबर : श्रद्धा वालकरची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने केलेल्या निर्घृण हत्येनं देशाला हादरवून सोडलं आहे. ही घटना सध्या चर्चेत असतानाच आता धुळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका तरुणाने आपल्या लिव्ह इन पार्टनरला श्रद्धा हत्याकांडाचं उदाहरण देत धमकी दिली आहे. 'त्याने श्रद्धाचे 35 तुकडे केले..पण मी तुझे 70 तुकडे करीन' अशी धमकी या व्यक्तीने दिल्याचा आरोप आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, 29 नोव्हेंबर रोजी अर्शद सलीम मलिकने आपल्या लिव्ह-इन पार्टनरला धमकी देण्यासाठी हे शब्द वापरले. महिलेच्या म्हणण्यानुसार, अर्शद सलीम मलिकने तिच्यावर बलात्कार केला आणि घटनेच्या व्हिडिओ क्लिपद्वारे तिला ब्लॅकमेल केले. त्यानंतरच तिने मलिकसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

'हे' हत्यार वापरून सगळ्यात आधी तिचे हात तोडले अन् मग..; श्रद्धा हत्याकांडाबाबत आफताबचा धक्कादायक खुलासा

महिलेनं पोलिसांना सांगितलं की, जेव्हा ती अर्शद सलीम मलिकला पहिल्यांदा भेटली तेव्हा त्याने आपले नाव हर्षल माली असल्याचा दावा केला होता. दोघेही जुलै 2021 पासून एकत्र राहत आहेत. या महिलेचं यापूर्वी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न झालं होतं. पण 2019 मध्ये तिच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. तिला तिच्या पतीपासून 5 वर्षांचं एक मूलही आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या लिव्ह-इन पार्टनरची खरी ओळख जुलै 2021 मध्ये कळली. जेव्हा दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी एफिडेविट मिळत होते. महाराष्ट्र टाईम्सच्या म्हणण्यानुसार, महिलेनं अर्शद सलीम मलिकवर जबरदस्तीने धर्मांतर करायला लावल्याचाही आरोप केला आणि मलिकने तिच्या मुलाचंही धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला.

श्रद्धा वालकर हत्याकांड: तुरुंगात दिवसरात्र काय करतो आफताब? पाहून अधिकारीही चक्रावले

महिलेने अर्शद मलिक आणि त्याचे वडील या दोघांवरही तिच्यासोबत गैरवर्तन करण्यासह अनेक आरोप केले आहेत. धर्मांतराला विरोध केल्याबद्दल मलिकने सायलेन्सरने तिची त्वचा जाळल्याची घटनाही तिने पोलिसांना सांगितली. तिने पोलिसांना सांगितलं की, "मी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा मलिकने मला श्रद्धा वालकर हत्याकांडाचा संदर्भ देत धमकी दिली आणि म्हटलं की, त्याने 35 तुकडे केले आहेत, पण मी तुझे 70 तुकडे करीन." महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अर्शद सलीम मलिकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Crime, Dhule