मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

100 कोटींचं ड्रग्ज, तस्कराची कल्पकता अधिकाऱ्यांनी ठेचली, मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

100 कोटींचं ड्रग्ज, तस्कराची कल्पकता अधिकाऱ्यांनी ठेचली, मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

मुंबई विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी आजदेखील ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. डीआरआय अधिकाऱ्यांनी तब्बल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे ड्रग्ज मुंबई विमानतळावर जप्त केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 6 ऑक्टोबर : मुंबईत ड्रग्ज विरोधात कठोर कारवाई सुरु आहे. गेल्या आठवड्यात नवी मुंबईतील वाशीमध्ये पोलिसांनी एक ड्रग्जची तस्करी करणारा ट्रक पकडला होता. या ट्रकमध्ये जवळपास 1400 कोटींपेक्षा जास्त किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी मुंबई विमानतळावर एका विदेशी प्रवाशाकडे तब्बल 100 कोटींचे ड्रग्ज आढळले होते. ड्रग्ज विरोधातील कारवाईच्या या बातम्या ताज्या असतानाच आज आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी आजदेखील ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. डीआरआय अधिकाऱ्यांनी तब्बल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे ड्रग्ज मुंबई विमानतळावर जप्त केले आहे.

मलावीहून कतारमार्गे मुंबईला प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाद्वारे अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती डीआरआयच्या अधिकऱ्यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी पाळत ठेवणारी आणि ट्रॅकिंग टीम तैनात करण्यात आली होती. या दरम्यान मुंबई विमानतळावर एक संशयित प्रवासी आढळला. या प्रवाशाने सुरुवातीला विविध कारणं दिली. पण अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली. त्याची कसून चौकशी केली. या दरम्यान त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये बनवलेल्या खोट्या पोकळ्यांमध्ये कल्पकतेने लपवून ठेवलेले 16 किलो हेरॉईन अधिकाऱ्यांच्या हाती लागले. या प्रवाशाकडे जवळपास 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे हेरॉईन आढळले. अधिकाऱ्यांनी प्रवाशाला तातडीने ताब्यात घेतलं आणि सर्व ड्रग्ज जप्त केले. संबंधित प्रवाशाला डीआरआय कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

(प्रेमाचं नाटक करून महिला अंमलदारासोबत भयानक कृत्य, बीडच्या शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा दाखल)

दुसरीकडे DRI अधिकार्‍यांनी एका पाठपुराव्याच्या कारवाईत काळजीपूर्वक नियोजित ऑपरेशनमध्ये एका घानायन महिलेला पकडले. ही महिला तस्करी केलेल्या दारूची डिलिव्हरी दिल्लीत घेऊन जाणार होती. या दरम्यान अधिकाऱ्यांनी घानाच्या नागरिकाला दिल्लीतील एका हॉटेलमधून ड्रग्जची डिलिव्हरी घेण्यासाठी आल्यावर पकडण्यात आले. तिला अटक करण्यात आली असून तिला मुंबईत आणण्यासाठी दिल्ली न्यायालयात ट्रान्झिट रिमांडची मागणी करण्यात येत आहे. तात्काळ प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Crime, Drugs