मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रेमाचं नाटक करून महिला अंमलदारासोबत भयानक कृत्य, बीडच्या शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा दाखल

प्रेमाचं नाटक करून महिला अंमलदारासोबत भयानक कृत्य, बीडच्या शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

याचठिकाणी तिची ओळख गल्लीतील विनायक अनिल सवाई याच्याशी झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  News18 Desk

बीड, 6 ऑक्टोबर : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच आता एका महिला अंमलदाराशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाचं नाटक करुन महिला अंमलदारावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बीडच्या शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

प्रेमाचं नाटक करून एका महिला पोलीस अंमलदाराला जाळ्यात ओढले. त्यानंतर अत्याचार करून ब्लॅकमेल करत तब्बल 13 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला. ही धक्कादायक घटना 4 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अंमलदार महिलेने 2020 मध्ये शिवाजीनगर ठाणे हद्दीत भाड्याचे घर घेतले. याठिकाणी ती आपली आई आणि भावासोबत राहते.

याचठिकाणी तिची ओळख गल्लीतील विनायक अनिल सवाई याच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. या दरम्यान विनायक सवाई याने पैशाची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस पतसंस्थेतून पीडितेने दोन लाख रुपये कर्ज घेऊन त्यास दिले. मात्र, दिलेल्या पैशाची मागणी केली असता, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला.

हेही वाचा - बुलेट अन् फोटोग्राफीची हौस, 6 वी पास तरुणाशी लग्न; शेवटी PNB मॅनेजरने सर्वांनाच हादरवलं!

या घटनेनंतर महिलेला हादराच बसला. याप्रकरणी आरोपी तरुणाविरोधात बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील याप्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

First published:

Tags: Beed news, Crime news