मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /डबल मर्डरने उडाली खळबळ, मित्रांसोबत गेलेल्या दोन तरुणांचा खून, शेतात सापडले मृतदेह

डबल मर्डरने उडाली खळबळ, मित्रांसोबत गेलेल्या दोन तरुणांचा खून, शेतात सापडले मृतदेह

आपल्या मित्रांसोबत (Friends) परगावी गेलेल्या दोन तरुणांची (Two youngsters) तिथून परत येताना हत्या (Murder) झाल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

आपल्या मित्रांसोबत (Friends) परगावी गेलेल्या दोन तरुणांची (Two youngsters) तिथून परत येताना हत्या (Murder) झाल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

आपल्या मित्रांसोबत (Friends) परगावी गेलेल्या दोन तरुणांची (Two youngsters) तिथून परत येताना हत्या (Murder) झाल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

सिवान, 2 सप्टेंबर : आपल्या मित्रांसोबत (Friends) परगावी गेलेल्या दोन तरुणांची (Two youngsters) तिथून परत येताना हत्या (Murder) झाल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या तरुणांसोबत नेमकं काय झालं, त्यांना कुणी मारलं याचा काहीही पत्ता सध्या लागत नसून या डबल मर्डरचं (Double Murder) गूढ वाढतच चाललं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून लवकरच याचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

अशी घडली घटना

बिहारच्या सिवानमधील शाहिल आजम आणि शहबल हे दोन तरूण त्यांच्या इतर दोन मित्रांसोबत गोपालगंजमधील हथुआमध्ये गेले होते. त्यांनी जाताना दोन बाईक घेतल्या होत्या. एका बाईकवर शाहिल आणि शहबल होते, तर दुसऱ्या बाईकवर त्यांचे इतर दोन मित्र होते. हथुआमध्ये एका मित्राला मोबाईल पोहोचवण्यासाठी हे गेले असल्याची माहिती मिळाली आहे. हथुआतील काम संपवून चौघे पुन्हा सिवानकडे निघाले.

परत येत असताना शाहिल आणि शहबल हे रमतगमत येत होते, तर दुसऱ्या बाईकवरील त्यांचे दोन मित्र वाटेत न थांबता थेट घरी पोहोचले. मात्र बराच वेळ झाला तरी शाहिल आणि शहबल घरी न पोहोचल्यामुळे त्यांच्या मित्रांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी या दोघांचा शोध सुरू केला. काही वेळानंतर त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीदेखील शोध सुरू केला, मात्र त्या दिवशी दोघांचाही पत्ता लागू शकला नाही.

शेतात मिळाले मृतदेह

गुरुवारी एका शेतात दोन तरुणांचे मृतदेह पडल्याचं गावकऱ्यांना दिसल्यानंतर त्यांनी याची कल्पना पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खातरजमा केली असता हे मृतदेह शाहिल आणि शहबल यांचेच असल्याचं त्यांना दिसून आलं.

हे वाचा - कोविन अ‍ॅप हॅक करुन घेतलं प्रमाणपत्र, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

तपास सुरू

पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवले आहेत. दोघांच्याही शरीरावर जखमा असून त्यांच्या पोटावर वार केल्याच्या जखमा आढळून आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या दोघांची कुणातरी सोबत हाणामारी झाली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी त्यांच्यासोबत गेलेल्या दोन मित्रांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

First published:
top videos

    Tags: Bihar, Crime, Murder