Home /News /aurangabad /

कोविन अ‍ॅप हॅक करुन लस न घेतलेल्या 16 जणांना दिलं प्रमाणपत्र, पोलिसात गुन्हा दाखल

कोविन अ‍ॅप हॅक करुन लस न घेतलेल्या 16 जणांना दिलं प्रमाणपत्र, पोलिसात गुन्हा दाखल

कोविन (Cowin application Hack) अ‍ॅप हॅक झाल्याची घटना घडली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला.

    औरंगाबाद, 02 सप्टेंबर: औरंगाबादमध्ये (Aurangabad)कोविन (Cowin application Hack) अ‍ॅप हॅक झाल्याची घटना घडली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोविन अ‍ॅप हॅक करुन 16 जणांना लस न घेताच लस घेतल्याचं प्रमाणपत्र देण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अ‍ॅप हॅक करणाऱ्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात (Begumpura police station) गुन्हा दाखल केला आहे. कोविन अ‍ॅप हॅक करुन डोस (Corona Vaccination) न घेताच लसीचं प्रमाणपत्र मिळवणारं रॅकेट सक्रिय झालं आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad)28 ऑगस्टला हा प्रकार घडला. आरेफ कॉलनी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या DKMM केंद्रावर हा प्रकार घडला असून कोरोना लसीकरण झालेल्या लाभार्थींच्या ऑनलाईन नोंदणीत हॅकिंग झाली आहे. हॅकिंग (Hacking) झाल्याची तक्रार महापालिका प्रशासनानं पोलिसांकडे केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. नेमका कसा बळावला संशय डीकेएमएम महाविद्यालयात शनिवारी लसीकरण सुरु होतं. त्यावेळी डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या कमी होती. 55 टोकन पहिल्या टप्प्यात वाटले होते. प्रत्येक व्यक्तीचं आधी रजिस्टरमध्ये नोंदणी केली जात होती. त्यानंतर कोविन पोर्टलमध्ये नोंद घेतली जात होती. 20 मिनिटांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांच्या जावयाची सुटका 55 जणांचं लसीकरण झाल्यानंतर डाटा ऑपरेटर शकील खान यांनी सगळ्या नोंदी बरोबर झाल्या आहेत का हे पाहण्यासाठी अ‍ॅप तपासले. त्यावेळी त्यांना या केंद्रावर 71 जणांच्या नोंदी दिसल्या. लगेचच खान यांनी ही माहिती वॉररुमच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख हेमंत राठोड यांना दिली. त्यानंतर राठोड यांनी तात्काळ या केंद्रावरील लसीकरण थांबवलं. आतापर्यंत ऑपरेटर शकील हे या केंद्रावर स्वतःच्या पर्सनल लॅपटॉपवरुन ऑनलाईन नोंदणी करत होते. मात्र शनिवारी पहिल्यांदाच त्यांनी महाविद्यालयाचा कॉम्प्युटर नोंदणी करण्यासाठी वापरला आणि त्याच दिवशी हा प्रकार उघडकीस आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले... आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडेलचा आणि अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे यांना याबाबतची माहिती दिली. तसंच ७१ जणांनी लस घेतल्याच्या अहवाल आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरीन कादरी यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली होती. 1 सप्टेंबरला डॉ. अमरिन कादरी यांच्या फिर्यादीवरुन बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार करताहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Aurangabad, Corona vaccination, Coronavirus

    पुढील बातम्या