फरीदाबाद, 17 फेब्रुवारी: एका युवकाची आणि युवतीची भर बाजारात गोळ्या घालून हत्या (murder) केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी चारचाकी गाडीत बसलेल्या एका युवकाला आणि युवतीला दिवसा ढवळ्या गोळ्या (shot dead) घातल्या आहेत. याप्रकारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या हत्येनंतर क्राइम ब्रांचच्या अनेक शाखा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली असून परिसरात नाकाबंदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना हरियाणातील फरीदाबाद (Faridabad) येथील आहे. येथील मार्केट नंबर एक जवळ एका गाडीत एक युवक आणि युवती बसले होते. त्याचवेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्या दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात गाडीत तसेच पडून होते. त्यानंतर स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रक्ताने माखलेले मृतदेह गाडीच्या बाहेर काढून उपचारासाठी फरीदाबाद रुग्णालयात हलवले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.
(वाचा - धक्कादायक! आईच्या हत्येनंतर 2 लेकरं मृतदेहाशेजारीच खेळत राहिली, बाप फरार )
डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. मृत युवकाची ओळख पटली असून तो फरीदाबादच्या सेक्टर 22 मधील रहिवाशी असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचं नाव गोल्डी असून तो एक जिम ट्रेनर असल्याची माहिती मिळाली आहे. तर मृत युवतीचं नाव मायका अरोरा असून ती फरीदाबाद येथीलच रहिवाशी आहे.
(वाचा - ठाण्यात शेअर रिक्षाने प्रवास करत असाल तर सावधान! घडली धक्कादायक घटना )
युवकाच्या डोक्यात तर युवतीच्या छातीत मारली गोळी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनाही रुग्णालयातील इमरजेन्सीमध्ये आणलं असता, गोळी लागल्याने दोघांचाही मृत्यू अगोदरच झाला होता. अज्ञातांनी युवकाच्या डोक्यात गोळी मारली होती, तर युवतीच्या छातीत गोळी मारली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डीसीपी एनआयटी अर्पित जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. त्यासाठी पोलिसांची अनेक पथकं या प्रकरणाची कसून तपासणी करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.