ठाणे, 17 फेब्रुवारी : शेअर रिक्षातून (sharing auto rickshaw) प्रवाशी वाहून नेताना त्यांना रस्त्याच्या मध्येच चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून मोबाईल, गॉगल, रोकड असा मुद्देमाल घेऊन लूट करणाऱ्या दोन आरोपींना नौपाडा पोलिसांनी (Nopada Police) अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांकडून नौपाडा पोलिसांनी 3 लाख 19 हजार रुपयांच्या मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन आरोपांनी नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या दोघांवर चार गुन्हे नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. शेअर रिक्षात बसून इच्छित स्थळी जाणाऱ्या प्रवाशाला रिक्षा थांबवून चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून मोबाईल आणि गॉगलची लूट करण्यात आली होती. या प्रकरणी नौपाडा पोलिसांकडे कुठलाही धागेदोरे नसताना केवळ तांत्रिक तपास करत होते. आरोपी इम्तियाज उस्मान कादरी(45) हा रिक्षा चालक आहे तर आरोपी परवेज उर्फ फिरोज नासीर खान(36) हा अमृतनगर मुंब्रा इथं राहणार आहे. या दोघांना नौपाडा पोलीस स्टेशनच्या पथकाने अटक केली आहे. साप दिसला म्हणून दुचाकी सोडून काढला पळ, नागोबा घुसले थेट सीटाखाली, पाहा हा VIDEO त्यांच्याकडून नौपाडा पोलीसांनी प्रवाशांकडून लुटलेले 1 लाख 70हजार रुपये किमतीची बजाज ऑटो रिक्षा, 35हजार रुपये किमतीची हिरोहोंडा फॅशन बाईक, 15हजाराचा नोकिया मोबाईल, 2हजाराचा रेबन गॉगल, 10 हजाराचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, 80हजाराची अपाची कंपनीची बाईक, 7हजाराचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, असा एकूण 3लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ‘माझीही मुलगी स्ट्रगल करतेय’; घराणेशाहीच्या वादात सुप्रिया पिळगांवकर यांची उडी याच प्रकारे अजूनही रिक्षाचालक ठाण्यात सक्रिय असून अशा चालकांचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलिसांना विशेष योजना आखली असून लवकरत अशा रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळ्या जाणार असल्याचे ठाणे पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.