डोंबिवली, 16 फेब्रुवारी : डोंबिवलीतून (Dombivali News) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशभरातील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. नागरिकांमध्ये वाढणारी क्रूर वृत्ती पाहता आपण धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे, असंच म्हणावं लागले. डोबिंवली पूर्वेतील दावडी येथे एका महिलेची हत्या (Women Killed) करण्यात आली. इतकच नव्हे तर हत्या केल्यानंतर महिलेचा मृतदेह तिच्याच घरातील सोफ्यात लपवून ठेवल्याचं समोर आलं. शिवशक्ती नगर भागातील ओम रेसिडेन्सीच्या बी विंगमध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर शिंदे येथे राहतात. नेहमीप्रमाणे ते सकाळीच कामावर निघून गेले. त्यांची पत्नी सुप्रिया घरी एकटीच होती. त्यांचा मुलगी दुपारीच शाळेत निघून गेला होता. संध्याकाळी किशोर कामावरुन घरी आले. मात्र सुप्रिया घरात नव्हती. काही वेळ त्यांनी वाट पाहिली, मात्र तरीही सुप्रिया आली नसल्याचं पाहून ते घाबरले. त्यांनी आजूबाजूलाही विचारपूस केली. हे ही वाचा- पैशांसाठी आयुष्याचा खेळ; लग्नाच्या 9 महिन्यातच तरुणीचा मृत्यू; पती आर्मी मॅन पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर शेजारी घरात आले व किशोर यांची चौकशी करू लागले. यावेळी त्यांना सोफा विस्कटलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी सोफा चाचपून पाहिला तर तेथे उभे असलेले सर्वजण हादरले. सुप्रियाचा मृतदेह सोफ्यात कोंबून भरला होता. सुप्रियाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र ही हत्या कोणी आणि का केली याबाबत मात्र अद्याप काहीच माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेमुळे किशोर यांना जबर धक्का बसला आहे. दरम्यान पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







