Home /News /crime /

पैशांसाठी केला आयुष्याचा खेळ; लग्नाच्या 9 महिन्यातच तरुणीचा मृत्यू; पती आहे आर्मी मॅन

पैशांसाठी केला आयुष्याचा खेळ; लग्नाच्या 9 महिन्यातच तरुणीचा मृत्यू; पती आहे आर्मी मॅन

Shocking news: संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या या 22 वर्षीय तरुणीच्या मृत्यूमुळे आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    पलवल, 16 फेब्रुवारी: हरयाणातील (Haryana News) पलवल जिल्ह्यातील औरंगाबाद गावात हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे 22 वर्षीय विवाहितेची हत्या केल्याचा धक्कादायक (Murder) प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आत्महत्या दाखविण्यासाठी तिचा मृतदेह गळफास लावून लटकवण्यात आला. लग्नाला (Marriage) अद्याप 9 महिने देखील पूर्ण झाले नव्हते. हुंड्याच्या  (Dowry) लालसेमुळे विवाहितेचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खांबी गावातील निवासी जगदीश यांनी आपली पूत्री भावना हिचं लग्न 26 एप्रिल 2021 रोजी औरंगाबाद गावातील निवासी राधेश्यामचे पूत्र गौरव शर्मासोबत झालं होतं. गौरव भारतीय सैन्यात कार्यरत आहे. लग्न मोठ्या थाटामाटात लावून देण्यात आलं होतं. ज्यात लाखो रूपये खर्च करण्यात आले होते. जगदीशने मुलीच्या लग्नात बराच हुंडा दिला होता, मात्र लग्नाच्या 4 - 5 दिवसांनंतरही हुंड्यासाठी तिला त्रास दिला जात होता. हे ही वाचा-अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, पकडलेल्या तरुणानं केला धक्कादायक दावा भावनाचा भाऊ धीरजने सांगितलं की, भावनाला तिच्या सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ केला जात होता. त्यांनी सांगितलं की, सासरच्या मंडळींना भरपून हुंडा देण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच सासरच्या मंडळींना भावनाकडून 10 लाख रुपये मागितले होते. पैसे मिळाले नाहीतर तर पती, सासरे, सासू, दीर आणि त्याच्या दोन बहिणींनी भावनाचा गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह गळफास लावून लटकवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात भावनाच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तरी या प्रकरणात तपास सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Gang murder, Haryana, Marriage, Suicide case, Wedding

    पुढील बातम्या