मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गर्लफ्रेंडसोबतच्या भांडणात 50 लाखांची मर्सिडीज जळून खाक, तरुणाने डोक्याला लावला हात

गर्लफ्रेंडसोबतच्या भांडणात 50 लाखांची मर्सिडीज जळून खाक, तरुणाने डोक्याला लावला हात

क्रोध हे विनाशाचं लक्षण आहे, असं म्हणतात. जेव्हा राग येतो, तेव्हा माणूस रागाच्या भरात नुकसान करून घेतो.

क्रोध हे विनाशाचं लक्षण आहे, असं म्हणतात. जेव्हा राग येतो, तेव्हा माणूस रागाच्या भरात नुकसान करून घेतो.

क्रोध हे विनाशाचं लक्षण आहे, असं म्हणतात. जेव्हा राग येतो, तेव्हा माणूस रागाच्या भरात नुकसान करून घेतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Tamil Nadu, India

    कांचीपुरम, 28 जानेवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंध, आत्महत्या तसेच हत्येच्या घटना घडत आहोत. यातच आता तमिळनाडू राज्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय. कांचीपुरममधल्या एका डॉक्टर युवकाने प्रेयसीशी भांडण झाल्यामुळे स्वतःची तब्बल 50 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ गाडी पेटवून दिली आहे. गुरुवारी (26 जानेवारी 2023) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल केलाय. ‘एबीपी लाईव्ह’ने याबाबतचं वृत्त दिलंय.

    क्रोध हे विनाशाचं लक्षण आहे, असं म्हणतात. जेव्हा राग येतो, तेव्हा माणूस रागाच्या भरात नुकसान करून घेतो. अशीच एक घटना तमिळनाडूत चेन्नईमधल्या कांचीपुरममध्ये घडलीय. रागाच्या भरात एका डॉक्टरने 50 लाखांची गाडी पेटवून दिली.

    कांचीपुरममध्ये गुरुवारी रात्री एका डॉक्टरचं (वय 28) त्याच्या प्रेयसीशी भांडण झालं. त्यानंतर डॉक्टर तरुणाने त्याची मर्सिडीज बेंझ कार पेटवून दिली. मोकळ्या मैदानात रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी सांगितलं की, धर्मपुरीत राहणाऱ्या कविन या युवकाने गेल्या वर्षी कांचीपुरममधल्या एका खासगी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केलं असून, सध्या तो एका खासगी रुग्णालयात काम करतो.

    पोलिसांनी माहिती दिली की, ‘कविनचं प्रेयसी काव्याशी भांडण झालं. त्यानंतर कविनने रागाच्या भरात कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. गाडीला आग लागल्याचं पाहून रस्त्यावरून जाणाऱ्यांनी अग्निशमन दल आणि बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली.’ दरम्यान, कांचीपुरम पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी कविनची जामिनावर सुटका केली आहे. कार पूर्णपणे जळून खाक झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

    हेही वाचा - कोल्हापूर हादरलं! मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून, शॉक लागल्याचा केला बनाव

    नेमकं काय घडलं?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘काव्या आणि कविन यांची कॉलेजपासूनची मैत्री होती. या दोघांमध्ये कॉलेजपासूनच प्रेमाचे धागे जुळले होते. काव्या सध्या एका खासगी दवाखान्यात काम करते. गुरुवारी रात्री कविननं काव्याला त्याच्या 50 लाखांच्या मर्सिडीज बेंझ कारमधून फिरायला नेलं. त्यानंतर दोघंही कांजीपुरम जिल्ह्यातल्या राजाकुलम तलावाजवळच्या निर्जन भागात गेले. तिथे या दोघांचं भांडण झालं व त्यानंतर रागाच्या भरात कविन याने कारवर पेट्रोल ओतलं व ती पेटवून दिली.’

    रागाच्या भरात कार पेटवून दिल्याचे प्रकार चित्रपटांमध्ये अनेकदा पाहण्यास मिळतात; मात्र प्रेयसीशी भांडण झाल्यामुळे तब्बल 50 लाख रुपये किमतीची कार पेटवून दिल्यामुळे या प्रकाराची चर्चा सुरू आहे.

    First published:

    Tags: Car, Crime, Tamil nadu