मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! मॉलमध्ये महिलेचं किळसवाणं कृत्य; VIDEO पाहूनच संताप येईल

Shocking! मॉलमध्ये महिलेचं किळसवाणं कृत्य; VIDEO पाहूनच संताप येईल

महिलेने मॉलमध्ये केलेल्या विचित्र कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

महिलेने मॉलमध्ये केलेल्या विचित्र कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

महिलेने मॉलमध्ये केलेल्या विचित्र कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 07 डिसेंबर : मॉलमध्ये (Mall) गेल्यानंतर आपण आपल्याला हवी ती वस्तू हातात घेतो. त्यावरील माहिती पाहतो, किंमत पाहतो. जर वस्तू आपल्याला आवडली किंवा किंमत आपल्याला परवडणारी असेल तर ती वस्तू आपण घेतो नाहीतर पुन्हा तशीच तिथं ठेवतो. पण एका महिलेने तर हद्दच केली. तिने मॉलमध्ये असं काही केलं जे पाहूनच किळस वाटेल (Woman disgusting act in mall) आणि संतापही येईल (Woman in Mall).

महिलेने मॉलमध्ये केल्याला विचित्र कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक महिला मॉलमध्ये शॉपिंग करायला गेली आणि तिने आपल्या हातात वस्तू घेऊन त्यांना चक्क आपली थुंकी लावली आहे आणि त्या तिने पुन्हा तशाच शेल्फवर ठेवल्या आहेत. महिलेचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हिडीओत  पाहू शकता महिला सुरुवातीला एक चिप्सच पॅकेट हातात घेते ते खोलते आणि त्यातील काही चिप्स खाते. महिलेला चिप्स आवडत नाही म्हणून ती पुन्हा आपल्या तोंडातील चिप्स तसेच त्या पाकिटात थुंकते आणि ते सील पॅक करून पुन्हा तिथंच ठेवते. महिला इतक्यावरच थांबत नाही तर पुढे ती पाण्यासोबतही तसंच करते. पाण्याच्या बाटलीला तोंड लावून पाणी पिते आणि पुन्हा ती बाटली तिथंच ठेवते.

हे वाचा - VIDEO - मोठ्या हुशारीने उडवली सोन्याची अंगठी, चोर महिलेची हेराफेरी कॅमेऱ्यात कैद

डेली मेलच्या रिपोर्टनुसार ही घटना अमेरिकेतील आहे. नशविलेतील एका मॉलमधील ही घटना आहे. या महिलेचं नाव लिब्बी बार्न्स आहे. ती एक मेकअप आर्टिस्ट असल्याचं सांगितलं जातं आहे. तिनं असं फक्त चिप्स आणि पाण्यासोबत नाही. तर सोडा आणि कँडीसोबतही केलं आहे.

हा व्हिडीओ कुणी बनवला आहे हे माहिती नाही. पण एकंदर व्हिडीओ पाहता व्हिडीओ बनवल्यामुळे तिला काहीच फरक पडत नाही असंच दिसते आहे. ती कॅमेऱ्याकडे पाहून हसतानाही दिसते. एक व्यक्ती तिला ती चोरी करते आहे का म्हणूनही विचारतो. तेव्हा आपण चोरी करत नाही, त्या वस्तू खरेदी करण्याचा विचार कर आहोत. तू तुझ्या कामावर लक्ष दे, असं त्याला ठणकावते.

हे वाचा - रिकाम्या ऑफिसमध्ये तरुणीचा कारनामा, सोशल मीडियात VIDEO होतोय व्हायरल

हा व्हिडीओ समोर येताच खळबळ उडाली आहे. तिच्या अटकेची मागणी होऊ लागली आहे. तर स्टोअरने दिलेल्या माहितीनुसार लिब्बीने त्या वस्तू खरेदी केल्या आहेत आणि त्याचे पैसेही दिले आहेत.

First published:

Tags: Shocking viral video, Viral, Viral videos