मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पती आणि सासऱ्याच्या अवैध संबंधाचा केला भांडाफोड; दुसऱ्या दिवशी आढळली मृतावस्थेत

पती आणि सासऱ्याच्या अवैध संबंधाचा केला भांडाफोड; दुसऱ्या दिवशी आढळली मृतावस्थेत

महिलेच्या माहेरच्या सदस्यांना यानंतर धक्काच बसला.

महिलेच्या माहेरच्या सदस्यांना यानंतर धक्काच बसला.

महिलेच्या माहेरच्या सदस्यांना यानंतर धक्काच बसला.

पाटना, 22 जानेवारी : नवादा नगर भागात विवाहिता सलमा खातून उर्फ अंजुम यांचा गळा दाबून हत्या (Murder) करण्यात आली आहे. सासरच्या मंडळींचं म्हणणं आहे की, अंजुमने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरीकडे मृत महिलेचा भाऊ गुलजार याने सांगितलं की, तिचा पती मोहम्मद शमशेर आणि सासरा कयूम यांचं दुसऱ्या महिलांसोबत अवैध संबंध होते. माझ्या बहिणीने याचा विरोध केला होता. त्यानंतर तिला मारहाण केली जात होती. सलमाने सासऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत व्हिडीओही शूट केला होता.

दुबईत आहे पती..

सलमा खातून हिचा पती सात-आठ महिन्यांपासून दुबईत आहेत. मृताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधाचा व्हिडिओ बनवल्यामुळे बहिणीचा गळा आवळून खून करण्यात आला. भैसूर मोहम्मद आझाद यांनी घरी येऊन बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. सासरच्या घरी पोहोचल्यावर बेडवर बहिणीचा मृतदेह पडलेला होता. खोलीतील छताची उंची इतकीही नाही की कोणी गळफास घेऊन शकेल. त्यामुळे तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं स्पष्ट आहे. सासरे वगळता कुटुंबातील इतर सर्व सदस्य फरार आहेत.

हे ही वाचा-रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या गरीब वृद्धांना लाथाबुक्क्यांनी मारहाण; एकाचा मृत्यू

गेल्या वर्षी जीभ कापली होती

भावाने सांगितले की, अवैध संबंधाला विरोध केल्याने बहिणीला अनेकदा मारहाण करण्यात आली. गेल्या वर्षी त्याच्या जिभेलाही दुखापत झाली होती. बहिणीचे लग्न तुटू नये म्हणून आम्ही फारसा विरोध केला नाही. सासरच्यांनीच तिची हत्या केली आहे. या घटनेनंतर युवतीच्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घरातील सदस्यांची अवस्था वाईट आहे. मृत महिलेला दोन मुलं व एक मुलगी आहे.

 

First published:

Tags: Bihar, Crime, Murder