Home /News /crime /

ब्युटी क्वीनचा डर्टी पिक्चर, बिजनेसमॅनकडून दीड कोटींची वसुली; मारहाणीचा गुन्हा दाखल करून म्हणते, 'पिक्चर अभी बाकी है..'

ब्युटी क्वीनचा डर्टी पिक्चर, बिजनेसमॅनकडून दीड कोटींची वसुली; मारहाणीचा गुन्हा दाखल करून म्हणते, 'पिक्चर अभी बाकी है..'

ब्यूटी क्वीन आणि 'मिसेज इंडिया राजस्थान-19' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंकाने एका बिजनेसमॅनची मोठी फसवणूक केली आहे. आतापर्यंत तिने बिजनेसमॅनकडून दीड कोटींची वसुली केली आहे.

    'मिसेज इंडिया राजस्थान-19’ प्रियंका चौधरी ब्यूटी क्वीन म्हणून ओळखली जात होती, मात्र आता तिचं नाव फसवणूक, लुटमारीशी जोडलं जात आहे. 2016 मध्ये एका व्यापारासोबत ओळख झाल्यानंतर प्रियंकाने 65 लाखांचा फ्लॅट, 9 लाखांची कार आणि 30 लाखांचं सोनं आणि दागिने घेतले. इतकच नाही तर फ्लॅटचा हप्ता भरण्यासाठी संपूर्ण लोन जमा करण्यासाठी ती व्यावसायिकावर दबाव आणत होती, अशी माहिती समोर आली आहे. फ्लॅटच्या आत एसी, पडदे, रंगकामदेखील व्यावसायिकाकडून करवून घेतलं. या महिलेने धमकी देऊन आतापर्यंत दीड कोटींपेक्षा जास्त लुटमार केली आहे. प्रियंका इतकी हुशार होती की, तिने मारहाणीचा गुन्हा दाखल केला आणि व्यावसायिकाला बलात्काराचा आरोप करेन अशी धमकी दिली. बलात्कार हा शब्द जोडल्यास त्याला तुरुंगाची हवा खावी लागेल, असे ती त्याला वारंवार बजावत होती. हे फक्त ट्रेलर आहे. आतापर्यंत प्रियंकाने मोठमोठे गुन्हे केले आहे. बलात्काराच्या भीतीने सुरुवातील व्यावसायिक काहीच बोलत नव्हता, नंतर मात्र त्याने पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तक्रारीनंतर ब्युटी क्वीन प्रियंका चौधरी आणि व्यावसायिक यांच्यातील नातं कसं बिघडलं, व्यावसायिक आणि प्रियांका चौधरी यांच्यात किती व्यवहार होता याबाबतचा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. मेव्हणा-मेव्हणीचं नातं ही गुन्हेगारीची कहाणी 2016 मध्ये सुरू झाली. जेव्हा प्रियंका तिच्या नवऱ्यासोबत व्यावसायिकाच्या घरी गेली होती. तिने त्याच्याकडे भाड्याने घर मागितले. सुरुवातीला व्यावसायिकाच्या पत्नीने या दोघांना पाठिंबा दिला. व्यावसायिकाची पत्नी आणि प्रियंका एकाच गावच्या होत्या, त्यामुळे तिने बहिण समजून मदत करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रियंका त्यांच्या घरी नियमित भेट देत असे. काही दिवसातच हे नाते भावा-बहिणीचं बनलं. व्यावसायिकाची पत्नी प्रियंकाला तिची लहान बहीण समजत असे. घरातील कामातही ती मदत करू लागली. प्रियंका आणि तिचे कुटुंब अनेकदा या व्यावसायिकाच्या घरी जेवायला जात होते. फ्लॅटवर चहाच्या बहाण्याने बोलावलं प्रियंकाने व्यावसायिकाला फ्लॅटवर चहा पिण्याच्या बहाण्याने बोलविले होते. प्रियांका म्हणाली की, तू नेहमीच दीदीबरोबर येतोस. तू कधी एकटा येत नाहीस. व्यापाऱ्याने नवऱ्याबद्दल विचारलं असता तिने तो बाहेर असल्याचं सांगितलं. प्रियांकाने त्याला घरी बोलावलं आणि चहा पिण्यास सांगितलं. ती त्याला जवळीक करीत होती. ती त्याला म्हणाली की, तुझ्याकडे पैशांची कमतरता नाही. तू  आम्हाला सहकार्य केले तर आम्ही फ्लॅट किंवा घर देखील घेऊ. त्यासाठी तुम्ही उधारावर पैसे द्या. मात्र व्यावसायिकाने तिचं बोलणं टाळलं.  आपल्याला जेवढे कर्ज मिळेल तेवढे कर्ज घ्या, बाकीचे आपण कर्ज देऊ, पण व्यावसायिकाने पुढे ढकलले. आपल्या घराजवळचा फ्लॅट त्याने पाहिल्याचे व्यावसायिकाला सांगितले. 64 लाखांचा फ्लॅट घेतला, एसी, पडदेही बसवले प्रियंकाने निर्माण नगरमध्ये 64 लाख रुपयांचा फ्लॅट पाहिला. फ्लॅटवरही कर्ज घेतले. आता वेळ होती फ्लॅटमध्ये एसी, पडदे, लाकडी फर्निचर आणि सोफा बसवण्याची. यासाठी प्रियांकाने व्यावसायिकाकडून सुमारे 15 लाख रुपये कर्ज घेतले. घासीलाल यांनी फ्लॅट मिळण्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंत एकूण 49 लाख रुपये खर्च केले. या रूपयांच्या बदल्यात प्रियंका आणि तिच्या पतीने व्यापाऱ्यास कोरे चेक व मुद्रांक कागदपत्रांवर व्यवहार केले. ते फ्लॅटमध्ये राहू लागले. या फ्लॅटसाठी 28 हजार रुपयांचे हप्ता जात होता. हे ही वाचा-गायकाला फॅनसोबत इंटिमेट VIDEO शेअर करणं पडलं महागात, सायबर क्राईमकडे गेलं प्रकरण प्रियंकाचा हेतू वाईट होता. बँकांमध्ये पडून असलेल्या पैशांचा काय उपयोग आहे, मला द्या, असं तिने व्यापारी घासीलाल यांना फ्लॅटमध्ये बोलवून सांगितलं होतं. इतकच नाही प्रियंकाच्या नवऱ्यानेही त्याला धमकावण्यास सुरुवात केली.  आले आणि प्रियंका म्हणाली की तुमच्या बँकांमध्ये पडून असलेल्या पैशांचा काय उपयोग आहे, ते मला द्या. आता प्रियांकाचा हेतू वाईट होऊ लागला होता. प्रियांका घरात एकटीच दिसली, असा आरोप केला जात आहे की ती आत लपून बसली होती. जेव्हा व्यापा .्याने नकार दिला, काही वेळाने नवरा घराबाहेर पडला आणि म्हणाला की माझे सर्व पैसे हप्त्यात जातात. ही जास्त पैशांची बाब नाही. तुरुंगात गेलास तर काय कराल? व्यावसायिकावर फ्लॅटचा लोन जमा करण्यासाठी दबाव केला जात होता. यानंतर 10 डिसेंबर 2018 मध्ये 5 लाख आमि 18 डिसेंबरला 2.50 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. दोन्ही पती-पत्नी व्यापाऱ्यावर बलात्काराचा आरोप दाखल करण्याची धमकी देत होते. व्यापारी घासीलाल हा प्रियंकाच्या सापळ्यात अडकला होता. प्रियंका त्याला बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्याला तुरूंगात पाठवण्याची धमकी देत होती. प्रियंकाने घासीलाल या व्यावसायिकाकडे नवीन कारची मागणी केली. दोघांनी त्याच्याकडून कारसाठी 8.45 लाख रुपये घेतले. फ्लॅटच्या कर्जासाठी 12 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. इतकच नाही मुलांच्या शाळेच्या फीसाठी 5 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. 11.30 लाख रुपयांची पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली. प्रियंकाने व्यापाऱ्याकडे स्वत: साठी दागिने मागितले. 30 लाख रुपयांचे दागिने बनविण्यात आले. सुकन्या योजनेतही 57 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. प्रियांकाने आता तिची शेवटची पैज खेळायला सुरुवात केली आहे. प्रियंका म्हणाली की मला दोन मुली आहेत, त्यांचे भविष्य पाहायचे आहे. 425 चौरस फुटांचा भूखंड पाहिलेला आहे. नकाशा मगावून आणि पैसे जमा करा. व्यावसायिक यावर चिडला, तो म्हणाला की, तू जर ताजमहाल मागितला तर तो मी देऊ का? यावर प्रियंका म्हणाली की, एकदा काय, दहा वेळा पैसे द्यावे लागतील. यानंतर प्रियंकाने पुन्हा व्यावसायिकाविरोधात 21 मे रोजी श्यामनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला. यावर ती म्हणाली की हे फक्त ट्रेलर आहे. बलात्काराची लाइल लिहिली तर आयुष्य उद्धवस्त होईल. तुरुंगात राहावं लागेल. अशा प्रकारे या महिलेने व्यावसायिकाची विविध प्रकार लूटमार केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Crime news, Rajasthan

    पुढील बातम्या