जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मुंबईतील प्रसिद्ध गायकाला फॅनसोबत स्वत:चा इंटिमेट VIDEO शेअर करणं पडलं महागात, पोलिसांकडे गेलं प्रकरण

मुंबईतील प्रसिद्ध गायकाला फॅनसोबत स्वत:चा इंटिमेट VIDEO शेअर करणं पडलं महागात, पोलिसांकडे गेलं प्रकरण

मुंबईतील प्रसिद्ध गायकाला फॅनसोबत स्वत:चा इंटिमेट VIDEO शेअर करणं पडलं महागात, पोलिसांकडे गेलं प्रकरण

गायकाने स्वत:चा इंटिमेट व्हिडीओ महिला फॅन समजून शेअर केला होता. त्यानंतर मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13:  मुंबई (Mumbai) पोलिसांनी एका अज्ञान व्यक्तीविरोधात 21 वर्षांच्या एक सिंगरला ब्लॅकमेलिंग करणे आणि खंडणी मागण्याच्या प्रकरणात (Man Threatens Singer To Leak His Obscene Videos) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सायबर क्राइमकडे या बाबत तपास करीत आहे. अद्याप गायकाने आपली ओळख सांगितलेली नाही. गायकाकडून घेतली लाखोंची खंडणी टाइम्स नाऊमधील बातमीनुसार, ब्लॅकमेलनरने धमकी देऊन पीडित सिंगरने 1 लाख 15 हजार रुपये वसूल केले आहेत. ब्लॅकमेलरने दावा केला होता की, त्याच्याजवळ गायकाचे आपत्तीजनक व्हिडीओ आहेत. जर त्याने पैसे दिले नाही तर त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जातील. मुलगी समजून गायकाने स्वत:चा आपत्तीजनक व्हि़डीओ केला शेअर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ब्लॅकमेलरने गायकाला स्वत: एक मुलगी असल्याचं सांगितलं होतं. गायकाची त्याच्यासोबत चांगली मैत्री झाली होती. यादरम्यान गायकाने ब्लॅकमेलरला मुलगी समजून स्वत:चे काही वैयक्तिक व्हिडीओ पाठवले होते. या व्हिडीओच्या माध्यमातून गायकाला ती व्यक्ती ब्लॅकमेल करीत होती. ब्लॅकमेलरने गायकाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या मैत्रीच्या जाळ्यात अडकवलं होतं. हे ही वाचा- Fish Lover नी लग्नात घातला राडा; एका माशाच्या तुकड्यासाठी मारहाण, 11 जणं जखमी तक्रारीनुसार, ब्लॅकमेलर मुलगी म्हणून गायकासोबत तासनतास गप्पा मारायचा. यादरम्यान, त्याने गायकाला त्याचे अंतरंग फोटो आणि व्हिडीओची विचारणा केली. नंतर या माध्यमातून गायकाला  ब्लॅकमेल करण्यात आलं. ब्लॅकमेलर वारंवार गायकाकडे पैशाची मागणी करत असे. मग कंटाळून गायकाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. अशी केली फसवणूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, ब्लॅकमेलरने एका तरुणीचा अश्लील व्हिडीओ गायकाला पाठवला होता, आणि तो स्वत:चा व्हिडीओ असल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर गायकाला त्याचा व्हिडीओ पाठवण्यास सांगण्यात आलं होतं. समोरील व्यक्तीकडून व्हिडीओ आल्यानंतर गायकाचा ब्लॅकमेलरवर विश्वास बसला व त्याने स्वत:चाही व्हिडीओ शेअर केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात