नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : दिल्लीच्या (delhi News) उत्तरेकडील जिल्ह्यातील सिरसपूर गावात मंगळवारी एका घरातील कुटुंबाने (Suicide) एकत्रितपणे आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राहत्या घरात कुटुंबातील चारही सदस्यांचे मृतदेह सापडले. मृतांमध्ये दोन मुलं, एक मबिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणात तपास सुरू असून अद्याप मृत्यूचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक व्यक्ती (30), पत्नी (25), दोन मुलं (एक 6 वर्षांचा आणि दुसरा 3 वर्षांचा) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. घटनास्थळाहून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असून यासाठी फॉरेन्सिक टीमलादेखील बोलवण्यात आलं आहे. हे ही वाचा- या सेल्फीमधला कोणीही नाही जिवंत, चार दिवसात संपलं अख्खं कुटुंब कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला त्याने आपली दोन मुलं आणि पत्नी यांना विष दिलं असावं. या प्रकरणात कोणी तिसऱ्या व्यक्तीचा समावेश असल्याची शक्यता नाही, असंही पोलिसांनी सांगितलं.
Delhi | Four members of a family, including two children, were found dead in the outer north district area. Investigation is underway, say police
— ANI (@ANI) November 30, 2021
एक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मृत कुटुंबातील नातेवाईतकांनी त्यांना एका खोलीत मृत अवस्थेत पाहिलं. यानंतर सकाळी 9 वाजता पोलीस कंट्रोल रूमला फोन करून याबाबत माहिती देण्यात आली. व्यक्तीने पत्नी, दोन्ही मुलांची हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या केल्याची शक्यता आहे. शेजारच्यांनी सांगितलं की, गेल्या 20 वर्षांपासून हे कुटुंब याच घरात भाड्याने राहत होते. नातेवाईकांनी सांगितलं की, कुटुंब आर्थिक चणचणीचा सामना करीत होतं. तर दुसरीकडे पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. घटनेमागील कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेजारच्यांचीही चौकशी केली.