मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मोबाईल फुटल्याचे पैसे मागितल्याने तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल; आरोपीला अटक

मोबाईल फुटल्याचे पैसे मागितल्याने तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल; आरोपीला अटक

मोबाईल फुटल्याचे पैसे मागितल्याने तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल

मोबाईल फुटल्याचे पैसे मागितल्याने तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल

उरणमध्ये मोबाईल फुटल्याचे पैसे मागितले म्हणून एकाने टोकाचं पाऊल उचललं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Raigad, India

प्रमोद पाटील, प्रतिनिधी

रायगड, 7 जानेवारी : अलीकडील दिवसात शुल्लक कारणावरुन वाद होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा वाद विकोपाला जाऊन जीव देखील गेले आहेत. अशीच एक घटना उरण तालुक्यातील जासई बेलपाडा येथे घडली आहे. मोबाईल फुटल्याचे पैसे मागितल्याने मानसिक तणाव आल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला अटक करण्यात

काय आहे प्रकरण?

उरण तालुक्यातील जासई बेलपाडा येथील सर्वेश कोळी हा तरुण 31 डिसेंबरला आपल्या मित्रांसोबत पार्टीला बसला होता. त्यावेळी संयोग आणि मृत सर्वेश यांच्यात बाचाबाची झाली, त्यात संयोगचा मोबाईल फुटला. मोबाईल मृत सर्वेशने फोडला म्हणून संयोगचे आई-वडील योगेश कोळी आणि राजश्री कोळी हे मृत सर्वेशच्या घरी जाऊन आमच्या मुलाचा 40 हजारांचा महागडा मोबाईल फोडला. त्याचे पैसे द्या म्हणून चार ते पाच वेळा घरी गेले. याचाच सर्वेशवर जबरदस्त मानसिक तणाव आल्याने यातूनच त्याने आपल्या घरातील वरच्या मजल्यावर जाऊन मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या दोरीने लोखंडी पाइपला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सर्वेशच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या राजश्री कोळी व योगेश कोळी या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून योगेश कोळी याला अटक केली आहे.

वाचा - pune crime : एकाशी तुटलं, दुसऱ्याशी जुळलं अन् तिथेच हुकलं;10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

18 डिसेंबरला तरुणीचा खून

रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये (Khalapur) अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाचा सुमारे आठवडाभराने उलगडा झाला आहे. संबंधित अल्पवयीन मुलीचा मृत्यू हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यात नाही तर अतिप्रसंगानंतर डोक्यात दगड घालून झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आठवडाभरापूर्वी खालापूर इथल्या जंगल भागात आढळून आलेल्या अल्पवयीन चिमुरडीच्या हत्येप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अजय चव्हाण असं या आरोपीचं नाव असून तो कारगाव तालुक्यातील रहिवासी आहे.

खालापूर तालुक्यातील कारगावनजीकच्या जंगलात 18 डिसेंबर रोजी आठ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. यावेळी, या चिमुरडीचा मृत्यू हा हिंस्त्र प्राण्याने केल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु वन विभागाच्या मदतीने या परिसरात हिंस्त्र श्वापदांच्या वास्तव्याच्या खुणा शोधल्या असता तसे कुठलेही पुरावे वनविभाग आणि पोलिसांना आढळून आले नाहीत. त्यातच या मुलीचा मृतदेह मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. पोस्टमॉर्टेम अहवालात या मुलीची हत्या झाल्याचं उघड झालं. गळा दाबून आणि डोक्यात दगड मारुन तिचा खून झाल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

First published:
top videos

    Tags: Crime, Raigad