मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दिल्लीत तरुणीला फरफटत नेणाऱ्या 5 आरोपींमध्ये एक जण भाजपचा नेता?

दिल्लीत तरुणीला फरफटत नेणाऱ्या 5 आरोपींमध्ये एक जण भाजपचा नेता?

 या अपघातातील एक आरोपी भाजपाशी संबंधित असल्यामुळे विरोधी पक्षांनी यावरून भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

या अपघातातील एक आरोपी भाजपाशी संबंधित असल्यामुळे विरोधी पक्षांनी यावरून भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

या अपघातातील एक आरोपी भाजपाशी संबंधित असल्यामुळे विरोधी पक्षांनी यावरून भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Delhi, India

  नवी दिल्ली, 03 जानेवारी :  दिल्लीतील सुलतानपुरीमधील कंझावाला भागातून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक भयंकर अपघाताची बातमी आली होती. कारमधून प्रवास करणाऱ्या मुलांनी एका मुलीला तब्बल 4 किलोमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामधील मुलीचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा धक्कादायक व्हिडिओही समोर आलाय. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या भयावह घटनेमधील जे पाच आरोपी आहेत, त्यापैकी एकजण भाजपशी संबंधित असल्याचं समोर येत असून यावरून आम आदमी पक्षानं भाजपवर निशाणा साधलाय.

  दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील सुलतानपुरी भागात भरधाव कारनं एका स्कूटीला जोरदार धडक दिली. ही स्कूटी एक 20 वर्षीय तरुणी चालवत होती. अपघातानंतर कारला अडकलेल्या तरुणीला कार मधून प्रवास करणाऱ्यांनी तब्बल 4 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. यामध्ये संबंधित तरुणी गंभीर जखमी झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांना तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला होता.

  (दिल्ली अपघाताप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर, नवीन वर्षाची पार्टी करुन मैत्रिणीसोबत...)

  तर, घटनास्थळापासून 12 किलोमीटर अंतरावर तिची स्कूटी सापडली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली, व त्यांना न्यायालयात हजर केलं. दिल्ली न्यायालयानं काल, सोमवारी (2 जानेवारी 2023) या पाचही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता अटक केलेले हे पाच आरोपी नेमके कोण आहेत, याबाबतही माहिती समोर आले असून यामधील एकजण भाजप संबंधित आहे, असं वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने यानी दिलंय.

  पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये मनोज मित्तल ( वय 27), दीपक खन्ना (वय 26 ), अमित खन्ना (वय 25 ) मिथुन (वय 26 , पूर्ण नाव माहिती नाही) , कृष्णा (वय 27 , पूर्ण नाव माहिती नाही) यांचा समावेश आहे. यामधील आरोपी मनोज मित्तल हा सुलतानपुरीमध्ये रेशन डीलर म्हणून काम करतो. घटनेच्या वेळी मनोज कारमध्ये होता. मनोज हा भाजपचा नेता असल्याचं बोललं जात आहे. मित्तल मंगोलपुरीच्या प्रभाग 42 चा भाजप सहसंयोजक झाल्याबद्दल त्याचे आभार मानणारे पोस्टर्सही परिसरात लावण्यात आलेत. आरोपींमध्ये मनोज मित्तल याचा समावेश असल्यानं आम आदमी पक्षानं भाजपवर निशाणा साधलाय. मित्तल हा भाजपचा नेता असल्यानं पोलिसांनी गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला.

  (चाकात अडकलेली तरुणी, यू-टर्न घेताना दिसली कार...पहाटे नेमकं काय घडलं? नव्या सीसीटीव्ही VIDEO मधून मोठा खुलासा)

  तर, आरोपी दीपक खन्ना हा अपघात झाला, त्यावेळी कार चालवत होता. दीपक हा व्यवसायानं चालक म्हणून काम करतो. आरोपी अमित खन्ना हा डेबिट, क्रेडिट कार्ड बनवण्याचं काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो सध्या एसबीआय कार्डच्या उत्तर नगर शाखेत काम करतोय. या प्रकरणातील आरोपी मिथुन हा व्यवसायानं हेअर ड्रेसर आहे. मिथुन पश्चिम दिल्लीतील नरैना येथे हेअर ड्रेसरचं काम करतो. तर पाचवा आरोपी कृष्णा हा कनॉट प्लेस येथील स्पॅनिश कल्चर सेंटरमध्ये काम करतो.

  दरम्यान, या अपघातातील एक आरोपी भाजपाशी संबंधित असल्यामुळे विरोधी पक्षांनी यावरून भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

  First published:
  top videos

   Tags: AAP, Accident, BJP, Delhi, New year 2023