नवी दिल्ली 04 जानेवारी : बहुचर्चित कंझावला रस्ता अपघातात मृत्यू झालेल्या अंजली सिंहचा ऑटोप्सी रिपोर्ट समोर आला असून, त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंजली सिंहच्या ऑटोप्सी अहवालात असं नमूद केलं आहे की तिची कवटी पूर्णपणे फुटली होती, ब्रेन मॅटर गायब होते, पाठीचा कणा फ्रॅक्चर होता आणि तिच्या शरीरावर एकूण 40 जखमा होत्या. 20 वर्षीय अंजलीच्या या अहवालात अशा भयानक आणि गंभीर जखमांचा उल्लेख करण्यात आला आहे. 1 जानेवारी रोजी अंजलीच्या स्कूटीला धडक देत कारने तिला कित्येक किलोमीटर फरफटत नेलं, त्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि तिच्या शरीराचीही भयानक अवस्था झाली. मौलाना आझाद मेडिकल कॉलेज (एमएएमसी) येथील डॉक्टरांच्या वैद्यकीय बोर्डाने तिच्या शरीराची ऑटोप्सी केली आणि अंजलीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. MAMC रिपोर्टमध्ये दिल्ली पोलिसांना अंजलीच्या गायब असलेल्या “ब्रेन मॅटर” बद्दल माहिती दिली आहे. Kanjhawala Accident: अंजली फुल नशेत गाडी चालवत होती, पण.. मैत्रीणीने सांगितली घटनेची आपबिती न्यूज18ला माहिती मिळाली आहे की अंजलीच्या बरगड्या मागच्या बाजूने बाहेर पडल्या होत्या आणि वाईटरित्या चिरडल्या गेल्या होत्या. अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे की अंजलीच्या कमरेच्या भागात मणक्याचे फ्रॅक्चर होते आणि तिचे जवळजवळ संपूर्ण शरीर मातीने आणि घाणीने भरले होते. सदमा लागल्याने आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने अंजलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर कारमध्ये अडकल्यानंतर शरीराच्या इतर भागात गंभीर जखमा झाल्या आहेत. एका सूत्राने रिपोर्टच्या हवाल्याने सांगितलं की, “अंजलीच्या अंतर्गत तपासणीत उघड झालं आहे की तिची कवटी फुटली होती. तिचं शरीर गाडीला लटकलं होतं आणि मातीने भरलं होतं. त्याची कवटी पूर्णपणे उघडली गेली होती. दोन्ही फुफ्फुसे स्पष्ट दिसत होती. याशिवाय, सूत्राने सांगितलं की, ‘या सर्व जखमा एकत्रितपणे नैसर्गिक मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात. याशिवाय शरीरावरील सर्व जखमा गाडीसोबत ओढलं गेल्याने झाल्याची शक्यता आहे. मात्र, केमेकिल अॅनालिसिस आणि जैविक नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर अंतिम अभिप्राय दिला जाईल.’ 4 नव्हे 12 किमीपर्यंत तरुणीला फरफटक नेलं; दिल्ली पोलिसांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा 1 जानेवारीच्या पहाटे वेगात असलेल्या बलेनो कारने स्कूटीला धडक दिल्याने अंजली सिंहचा मृत्यू झाला होता. कंझावला परिसरात तिचा मृतदेह सापडला असून पाचही आरोपींना सोमवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरावर इतर अनेक जखमांचा उल्लेख आहे पण लैंगिक अत्याचाराची शक्यता नाकारली गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.