जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / दिल्ली अपघात प्रकरणी आरोपींची मोठी कबुली; गाडी न थांबवण्याचं सांगितलं कारण

दिल्ली अपघात प्रकरणी आरोपींची मोठी कबुली; गाडी न थांबवण्याचं सांगितलं कारण

दिल्ली अपघात प्रकरणी आरोपींनी आज महत्त्वाची कबुली दिली आहे.

दिल्ली अपघात प्रकरणी आरोपींनी आज महत्त्वाची कबुली दिली आहे.

दिल्ली अपघात प्रकरणी आरोपींनी आज महत्त्वाची कबुली दिली आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 जानेवारी : राजधानी दिल्लीतील कंझावला अपघात प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आता आरोपींनी अंजली गाडीखाली अडकल्याची माहिती असल्याचे मान्य केले आहे. आरोपींनी सांगितले की, अपघातानंतर ते खूप घाबरले होते म्हणून त्यांनी कारचे अनेक वेळा यू-टर्न घेतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याची कथा खोटी असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. 31 डिसेंबरला रात्री दीडच्या सुमारास कंझावला परिसरात अंजलीचा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली स्कूटीवरून घरी परतत होती. त्यावेळी कारने धडक दिली होती. अपघातानंतर तरुणांनी कारसह पळ काढला. अंजली गाडीखाली अडकली होती. तिला 12 किमीपर्यंत फरफटत नेले. यापूर्वी 4 किमी फरफटत नेल्याचे प्रकरण समोर आले होते. नंतर असेही समोर आले आहे की, अंजलीसोबत तिची मैत्रिण निधी होती. तिला देखील किरकोळ दुखापत झाली होती. पण, अपघातानंतर ती घटनास्थळावरून पळून गेली. वाचा - 6 महिन्यांपूर्वीही झालेला अंजलीचा भीषण अपघात, जीवे मारण्याचा होता कट? मोठी अपडेट निधी 8 महिन्यांपासून आग्र्याला तारखेला गेली नव्हती दुसरीकडे, आग्रा येथील त्यांच्या वकिलाने निधीबाबत खुलासा केला आहे. वकील आसिफ आझाद यांनी सांगितले की, निधी गांजाच्या तस्करीप्रकरणी गेल्या 8 महिन्यांपासून न्यायालयात हजर झाली नाही. एवढेच नाही तर निधीने वकिलाशीही संपर्क साधला नाही. निधला जीआरपीने आग्रा येथे गांजाची तस्करी करताना पकडले होते. दिल्ली दुर्घटनेची माहिती मिळताच जीआरपीने तिचे रेकॉर्ड शोधले. 6 डिसेंबर 2020 रोजी निधीला आग्रा कँट स्टेशनवर पकडण्यात आल्याची माहिती मिळाली. तेथून तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

News18लोकमत
News18लोकमत

काय प्रकरण आहे? दिल्लीतील कंझावाला येथे 31 डिसेंबरच्या पहाटे एका तरुणीचा मृतदेह विवस्त्र आढळून आला. शरीराचे अनेक भाग छिन्नविछिन्न झाले होते. पोलिसांचा दावा आहे की, कारमध्ये आलेल्या 5 तरुणांनी एका तरुणीला धडक दिली, त्यानंतर तिला 10 ते 12 किमीपर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मृतदेह मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास केला असता, पोलिसांना घटनास्थळापासून काही अंतरावर एक स्कूटीही पडली होती, जी अपघातग्रस्त होती. स्कूटीच्या क्रमांकाच्या आधारे तरुणीची ओळख पटली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात