लखनऊ 10 डिसेंबर : पती-पत्नीमध्ये लहान-मोठ्या गोष्टींवरुन वाद होणं ही सामान्य बाब आहे. जवळपास प्रत्येक जोडप्याचं काही ना काही कारणावरुन भांडण होत असतं. मात्र काहीवेळी ही भांडणं अतिशय भयानक रूप घेतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. यात एका पती-पत्नीचं बटाट्याच्या पराठ्यावरुन भांडण झालं. याचा परिणाम म्हणजे पतीला आपला जीव गमवावा लागला. नंतर या प्रकरणात अनेक नवे खुलासेही झाले. एकाच रात्री दोनदा शरीरसंबंध ठेवण्यास पत्नीचा नकार, पतीने उचललं टोकाचं पाऊल ही घटना उत्तर प्रदेशातील अलिगढमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पतीचं नावव लक्ष्मण आहे. या व्यक्तीचं लग्न ८ वर्षांपूर्वी बुलंदशहरमधील तरुणीसोबत झालं होतं. नुकतंच पती-पत्नीमध्ये भांडण झालं होतं. पतीने खाण्यासाठी बटाट्याचा पराठा बनवून मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की दोघंही घरातून बाहेर निघून गेले. यानंतर काहीच वेळाने पतीचा मृतदेह सिव्हिल लाईन क्षेत्रात रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. मृतदेह सापडताच एकच खळबळ उडाली. मृताच्या नातेवाईकांनी मृताच्या पत्नीला पोलिसांच्या स्वाधीन करत आरोप लावला की तिने आपल्या मेहुण्यासोबत मिळून पतीची हत्या केली आहे. नातेवाईकांनी म्हटलं की या महिलेचे आपल्या मेहुण्यासोबत अवैध संबंध आहेत. ‘आई-बाबा घरी नाहीत, तू ये..’; प्रेयसीने बोलावताच तिच्याकडे गेला अन् तरुणासोबत भयानक घडलं पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की गुरुवारी रात्री पती आणि पत्नीमध्ये आलू पराठा बनवण्यावरुन वाद झाला होता. पतीने पराठा बनवून मागितल्याने पत्नी नाराज झाली आणि शिवीगाळ करू लागली. यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. ज्यामुळे पती बाहेर निघून गेला, तिकडेच पत्नीने त्याची हत्या केली, असा आरोप केला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.