प्रयागराज, 4 मे : कौशांबी जनपदच्या (Uttar Pradesh News) करारी भागात अडहरा गावाच्या प्राथमिक शाळेत पाणी पित असताना एका लहान मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मुलीला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पाणी पित असताना करंट लागल्यामुळे मुलगी जागेवरच बेशुद्ध पडली होती. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याशिवाय गावकरीही या प्रकरणावर संतापले आहेत. आईच्या समोर करंटमुळे तडफडत होती… अडहरा गावातील प्राथमिक शाळेत अंगणवाडी केंद्रात हा प्रकार घडला. दुपारी साधारण साडे बारा वाजता गावातील अमर सिंहची पत्नी अडीच वर्षांची मुलगी हनीला घेऊन अंगणवाडी केंद्रात घेऊन गेली होती. त्याच वेळी हनी खेळता खेळता हँडपंपावर पाणी पिण्यासाठी गेली. हँडपंपला लागलेल्या सबमर्सिबलला स्पर्श करताच तिला जोरदार करंट लागला. हनीला तडफडताना पाहून शिक्षक आणि उपस्थितांनी तिला करंटपासून वेगळं केलं. नाजूक अवस्थेतच तिला रुग्णालयात घेऊन गेले. हे ही वाचा- शेजाऱ्यानेच मुलींचा विनयभंग केल्याची आईची तक्रार, तिने विरोध केला म्हणून आरोपीने केला धक्कादायक प्रकार मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. हातात मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना जबर धक्का बसला. याशिवाय या घटनेमुळे गावकरीही संतापले. या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेवर सवाल उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.