जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / महिलेचे पाय कापून निर्घृण हत्या, 7 वर्षांनी आरोपीला कोर्टानं सुनावली शिक्षा

महिलेचे पाय कापून निर्घृण हत्या, 7 वर्षांनी आरोपीला कोर्टानं सुनावली शिक्षा

चांदीसाठी महिलेची निर्घृण हत्या

चांदीसाठी महिलेची निर्घृण हत्या

हा गुन्हा 9 जुलै २०१६ मध्ये घडला होता. त्याचा निकाल तब्बल ७ वर्षांनी लागला असून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

  • -MIN READ Local18 Rajasthan
  • Last Updated :

आशीष कुमार, प्रतिनिधी दौसा : 7 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा अखेर आरोपीला झाली आहे. आरोपीने एका महिलेची निर्घृण हत्या करून तुकडे केले. हा गुन्हा 9 जुलै २०१६ मध्ये घडला होता. त्याचा निकाल तब्बल ७ वर्षांनी लागला असून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. दौसा कोर्टात आज एका खून खटल्यात मोठा निर्णय आला आहे. न्यायालयाने 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, प्रत्यक्षात 9 जुलै 2016 रोजी दौसा शहरातील मंडी रोड येथून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचे अपहरण करून सिंगवाडा गावातील आयटीआय केंद्रामागील जंगलात धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली होती.

News18लोकमत
News18लोकमत

आरोपींनी पीडितेच्या हातातील चांदीचं कडं लुटण्यासाठी तिचे दोन्ही पाय कापले आणि चांदीच्या बांगड्या काढून घेऊन महिलेची हत्या केली. 9 जुलै 2016 रोजी दौसा शहरातील मंडी रोड येथून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचे अपहरण करून सिंगवाडा गावातील आयटीआय केंद्राच्या मागे जंगलात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती.

‘तोंड उघडलंस तर जीव घेईन’, 10 वीच्या विद्यार्थिनीला फरफटत नेलं, मनसुन्न करणारी घटना

आरोपींनी पीडितेचे चांदीच्या बांगड्या लुटण्याच्या उद्देशाने तिचे दोन्ही पाय कापले आणि चांदीच्या बांगड्या काढून घेऊन महिलेची हत्या केली. अज्ञात महिलेच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती, त्यानंतर पोलिसांनी ओळख पटवण्याचे प्रयत्न केले आणि मृत महिलेचे नाव रामप्यारी रहिवासी सबलपुरा असल्याची माहिती मिळाली आहे.

निवृत्त जवानाने पत्नीचा केला खून, मृतदेह पुरला जमिनीत; असा झाला उलगडा

या संपूर्ण प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर पोलिसांनी कलम 302 आणि 396 अंतर्गत चालान सादर केले. यानंतर 26 साक्षीदार आणि 57 कागदपत्रे न्यायालयात हजर करण्यात आली. सर्व साक्षीदार आणि कागदपत्रांच्या आधारे दौसा न्यायालयाचे न्यायाधीश मोहनलाल सोनी यांनी आरोपी सिताराम, रामनिवास आणि रामस्वरूप यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात