जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / निवृत्त जवानाने पत्नीचा केला खून, मृतदेह पुरला जमिनीत; असा झाला उलगडा

निवृत्त जवानाने पत्नीचा केला खून, मृतदेह पुरला जमिनीत; असा झाला उलगडा

माजी सैनिकाने केला पत्नीचा खून

माजी सैनिकाने केला पत्नीचा खून

एका निवृत्त सैनिकाने वादातून पत्नीचा खून केला. त्यानंतर मृतदेह जमिनीत दफन करून फरार झाला.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

उन्नाव, 19 मे : उन्नावमध्ये खूनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका निवृत्त सैनिकाने वादातून पत्नीचा खून केला. त्यानंतर मृतदेह जमिनीत दफन करून फरार झाला. एक नातेवाईक महिला खून झालेल्या महिलेला शोदण्यासाठी आली तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. महिलेने दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी आले आणि चौकशी सुरू केली. पोलिसांनी निवृत्त सैनिकाकडे चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने दिलेल्या माहितीनंतर त्याने घरात दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी खोदकाम करून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिशेखर सिंह यांनी सांगितलं की, आरोपीला या प्रकरणी अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे. उल्हासनगरची डॉक्टर निघाली दलाल, नवजात बाळाचा रेटही ठरवला!   इंद्रा नगरमध्ये राहणारे लखन सिंहजो हे लष्करातून निवृत्त झाल्यानंतर एका खासगी कंपनीत काम करत होते. उन्नावच्या इंद्रा नगरमध्ये त्यांची पत्नी संतोष सिंह राहत होती. राम लखन यांना दारुचं व्यसन होतं अशीही माहिती समजते. त्यामुळे दररोज घरात वाद आणि मारहाण होत होती. राम लखनची पत्नी संतोषची भाची घरी आली तेव्हा तिला घरात पाळीव कुत्रा मेलेला दिसला. तसंच घराला कुलूप लावलेलं होतं. यानंतर तिला शंका आल्यानं ११२ नंबर डायल करून पोलिसांना बोलावलं. पोलीस घटनास्थळी येताच घराचं कुलूप तोडून तपास केला. तिथे कोणीच नव्हतं. पोलिसांनी संशय आल्याने घराबाहेर बांधकाम सुरू असलेल्या एका प्लॉटच्या ठिकाणी खोदकाम केलं. तिथं संतोषचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिशेखर यांनी सांगितले की, आरोपीला अटक केली आहे. आरोपी रामलखन याने खून केल्याची कबुली दिलीय. प्रथमदर्शनी हा घरगुती वादातून खून झाल्याचं दिसून येतंय. गळा दाबून खून केल्याचं समोर आलं असून आता अधिक तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात