शिवाजी गोरे (रत्नागिरी), 23 फेब्रुवारी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात दाभोळ बंदरामध्ये डिझेलची तस्करी करणारी सोन्याची जेजुरी नावाची बोट जप्त करण्यात आली आहे. दरम्यान ही बोट नांगर टाकून दाभोळ बंदरात उभी ठेवण्यात आल्याने धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे डिझेल साठ्याच्या मुळाशी जावून कस्टम विभाग शोध घेत असून आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीचे धागेदोरे हाती लागले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दाभोळ ते गुहागर दरम्यान 10 फेब्रुवारी 2023 रोजी सायं. 5 च्या दरम्यान डिझेल तस्करी करणार्या सोन्याची जेजुरी बोटीवर रत्नागिरी कस्टम विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली होती.
हे ही वाचा : राज्याच्या राजकारणाला नवे वळण, आदित्य ठाकरेंचं फडणवीस यांच्याबद्दल मोठं विधान
बोटीतील 17 कंपार्टमेंटमधील 2 कंपार्टमेंट रिकामे होते. अर्वरित 15 कंपार्टमेंटमध्ये डिझेलचा साठा आढळून आला होता. दरम्यान या बोटीवर तब्बल 40 हजार लिटर इतका डिझेलचा साठा कस्टमने जप्त केला होता.
हे ही वाचा : ‘चुकून बोलून गेलो’; त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितली जाहीर माफी
मात्र हा साठा पाठवणारा अथवा हस्तांतरित करणारा कोण आहे याचा शोध आता रत्नागिरी कस्टम विभागाच्यावतीने घेण्यात येत आहे. दरम्यान ही बोट रेवस या ठिकाणाहून आली असल्याची माहिती कस्टम विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. त्यामुळे रेवसपासून देखील कस्टम कसून तपास करत आहेत.