Home /News /crime /

पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहून तरुणाचा संताप; आरोपीला स्फोटात थेट उडवूनच टाकलं!

पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहून तरुणाचा संताप; आरोपीला स्फोटात थेट उडवूनच टाकलं!

पत्नीला झालेला त्रास पतीला पाहावला नाही, म्हणून त्याने असं कारस्थान केलं.

    रतलाम, 17 जानेवारी : सूड उगवण्याच्या अनेक कहाण्या तुम्ही आतापर्यंत वाचल्या असतील. मात्र ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल. ही घटना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) रतलाम जिल्ह्यातील रत्तागड नावाच्या छोट्याशा गावातील आहे. येथे 4 जानेवारी रोजी एक शेतकरी शेतात ट्यूबवेलचं बटन दाबतो आणि स्फोटात तो छिन्नविधिन्न होतो. स्फोटाचा (Blast) आवाज एक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येतो. काही वेळानंतर गावकरी तेथे पोहोचले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आरोपीचा मास्टर प्लान आणि पोलिसांचा तपास.. सामूहिक बलात्कारापासून सुरू झालेल्या या गुन्ह्याची सुरुवात एक वर्षभरापूर्वी सुरू झाली. गावातील भंवरलाल पाटीदार (54), लालसिंह खतीजा (35) आणि दिनेश (37) यांनी गावातील सुरेश (32) याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना तिघांनीही त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा सुरेश शांत झाला. मात्र त्याच्या शरीरात सूडाचं रक्त सळसळत होतं. डोळ्यांदेखत पत्नीचा बलात्कार करताना त्याने पाहिलं होतं. मात्र तेव्हा तो काहीच करू शकला नाही. सहा महिन्यांपर्यंत तो शांत होता आणि सूड उगवण्याची तयारी करीत होता. हे ही वाचा-वृद्ध महिलेकडे शरीरसंबंधासाठी मागितली तरुणी; नकार देताच तरुणांचं घृणास्पद कृत्य टीव्हीवरुन घेतलं प्रशिक्षण टीव्हीवर त्याने पाहिलं की, डेटोनेटर आणि जिलेटिनच्या काड्यांचा उपयोग करून नक्षलवादी जवानांवर हल्ला करता. रतलाममध्ये डेटोनेटर आणि जिलेटिन सहज उपलब्ध होतात. विहिर तयार करण्यापासून मासे मारण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याने भंवरलालपासून सुरुवात केली. त्याने भंवरलालच्या शेतात ट्यूबवेलच्या स्टार्टरमध्ये डेटोनेटर आणि जिलेटिन सेट केलं. मात्र जिलेटिनच्या कांड्या कमी होत्या, त्यामुळे स्फोट तर झाला मात्र भंवरलाल बचावला. सहा महिन्यांनंतर त्याने लाल सिंहवर निशाणा साधला. यंदा त्याने तिच पद्धत वापरली. मात्र यंदा त्याने 14 कांड्यांचा वापर केला. लाल सिंहने स्टार्टरचं बटन दाबताच स्फोट झाला यात त्याचा मृत्यू झाला. गावात घटलेल्या या दुसऱ्या घटनेनंतर पोलिसांना तपास सुरू केला. हा अपघात नसून कट असल्याचं समोर आलं. तपासाअंती यात सुरेश लोढाचं नाव समोर आलं. तो देव दर्शनासाठी जाणार होता. 6 जानेवारी रोजी त्याला पकडण्यात आलं. त्यानेही आपला गुन्हा कबुल केला आहे. मात्र दोन बलात्कार करणाऱ्यांना तो शिक्षा देऊ शकला नाही याचं दु:ख व्यक्त केलं. तरी पोलिसात हे प्रकरण गेल्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी तुरुंगात रवाना केलं आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bomb Blast, Crime news, Madhya pradesh, Murder

    पुढील बातम्या