नवी दिल्ली, 28 एप्रिल : देशाच्या सर्व भागांमध्ये, अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. असं असूनही या फसवणुकीत गुंतलेले लोक निर्ढावलेले आहेत. गुप्तचर यंत्रणा त्यांच्यावर सातत्यानं लक्ष ठेवून आहेत. त्याचे चांगले परिणामही मिळत आहेत.
अशाच एका तस्कराला नुकतंच हैदराबाद विमानतळावर (Hyderabad Airport) पकडण्यात आलं आहे. इथे कस्टम टीमने (Custom Team) टांझानियन वंशाच्या एका प्रवाशाला (Tanzanian traveler) 79 कॅप्सूल अर्थात 1157 ग्रॅम कोकेनसह (Cocaine) पकडलं आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 11.57 कोटी रुपये आहे. डीआरआयने ते जप्त केले आणि NDPS कायद्यांतर्गत आरोपी प्रवाशाला अटक केली.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कस्टम टीमने एका प्रवाशाला मोठ्या प्रमाणात कोकेनसह पकडलं होतं. त्याच्याकडून सुमारे 89.745 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आलं होतं.
हे वाचा - '..अपमानित महिलेला घाबरायला हवं', भाजप महिला नेत्याची FB पोस्ट लिहून आत्महत्या
दिल्ली मुख्यालयातील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टांझानियन वंशाचा एक प्रवासी 21 एप्रिल रोजी जोहान्सबर्गहून दुबईमार्गे एमिरेट्सच्या विमानाने हैदराबादला पोहोचला होता. गुप्तचर आणि डेटा विश्लेषणाच्या मदतीने, पकडलेल्या हवाई प्रवाशाने चौकशीत सांगितलं की, त्याने 'कोकेन' असलेल्या कॅप्सूल गिळल्या होत्या. त्याने विमानतळावर 22 कॅप्सूल काढल्या आणि तत्काळ वैद्यकीय मदत मागितली. त्यानंतर त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, जिथे या प्रवाशाने वैद्यकीय देखरेखीखाली पाच दिवसांच्या कालावधीत आणखी 57 कॅप्सूल काढल्या. त्याच्याकडून एकूण 79 कॅप्सूल जप्त करण्यात आले. प्रतिबंधित सामग्री असलेल्या कॅप्सूल चिकट पारदर्शक टेप वापरून झाकलेल्या होत्या.
हे वाचा - मध्यरात्रीत सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा सुपडा साफ, दोन AK-47 ही जप्त
प्रवाशाने बाहेर काढलेल्या या कॅप्सूल उघडल्या. त्यामधून तस्करी करून आणलेलं 1157 ग्रॅम 'कोकेन' जप्त करण्यात आलं, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 11.57 कोटी रुपये आहे. चौकशीदरम्यान हा प्रवासी टांझानियाहून जोहान्सबर्गला गेल्याची माहिती मिळाली आहे. जोहान्सबर्गहून त्याला प्रिटोरियाला नेण्यात आलं. भारतात येण्यापूर्वी त्याने या कॅप्सूल गिळल्या. 3-4 दिवसांच्या कालावधीत त्याला या कॅप्सूल बाहेर काढून अज्ञात व्यक्तीच्या ताब्यात द्यायच्या होत्या. या आरोपी प्रवाशाला न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cocaine, Crime news, Hyderabad