जाहिरात
मराठी बातम्या / देश / Pulmawa Encounter: मध्यरात्रीत दोन दहशतवाद्यांचा सुपडा साफ, दोन AK-47 ही जप्त; सुरक्षा दलाचं यश

Pulmawa Encounter: मध्यरात्रीत दोन दहशतवाद्यांचा सुपडा साफ, दोन AK-47 ही जप्त; सुरक्षा दलाचं यश

Pulmawa Encounter: मध्यरात्रीत दोन दहशतवाद्यांचा सुपडा साफ, दोन AK-47 ही जप्त; सुरक्षा दलाचं यश

पुलवामा जिल्ह्यात (Pulwama District) बुधवारी रात्री सुरक्षा दल (Security Forces) आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 28 एप्रिल: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा जिल्ह्यात (Pulwama District) बुधवारी रात्री सुरक्षा दल (Security Forces) आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. तर या चकमकीत (Encounter) एक जवान जखमी झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील मित्रीगाम भागात बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली. मात्र गुरुवारी पोलिसांनी सांगितलं की, पुलवामाच्या मित्रीगाम भागात सुरू असलेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार झाला आहे. अशा स्थितीत एकूण दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन एके 47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, चालू असलेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार झाला आहे. स्थानिक दहशतवादी एजाज हाफिज आणि शाहिद अयुब अशी ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. दहशतवाद्यांकडून दोन AK47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. दोघेही अल बद्रे संघटनेचे होते. देशात Corona ची चौथी लाट सुरू झाली?, सर्वेक्षणातून समोर आला रिपोर्ट   आयजीपी काश्मीर विजय कुमार म्हणाले की, चकमकीत ठार झालेले दोन्ही दहशतवादी मार्च-एप्रिल 2022 या महिन्यात जिल्ह्यात बाहेरून आलेल्या मजुरांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये सामील होते. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, जैश-ए-मोहम्मद (JeM) संघटनेच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्यांसह दोन-तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आलं होतं. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवल्यामुळे कारवाई मध्यंतरी थांबवण्यात आली. या वर्षात आतापर्यंत 41 चकमकी या वर्षी 1 जानेवारीपासून आतापर्यंत दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांच्या 41 चकमकी झाल्या आहेत. ज्यामध्ये 59 दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलं आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे 10 दहशतवाद्यांना लपविण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात