पाटना, 29 जानेवारी : बिहारमधील (Bihar News) भभुआमधून एक धक्कादायक (Shocking News) वृत्त समोर आलं आहे. येथे एका मंदिरात चोरी करण्यासाठी चोरांनी 7 कुत्र्यांची हत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. लोकांनीही मनस्ताप व्यक्त केला आहे. ही घटना बिहारमधील भभुआ जिल्हा स्टेशन रोड येथील आहे. भभुआ रोडच्या काही अंतरावर काली मातेचं जुनं मंदिर आहे. सांगितलं जात आहे की, या मंदिराच्या दानपेटीवर समाजकंटकांची नजर होती. यापूर्वीही मंदिरातून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पैशांच्या लालसेपोटी प्राण्यांची हत्या करण्यात आली. स्थानिकांनी सांगितलं की, मंदिराच्या दानपेटीवर समाजकंटकांची नजर होती. याशिवाय आजूबाजूच्या कुत्र्यांना मंदिरात जेवण दिलं जात होतं. कुत्रेदेखील मंदिराजवळ राहून राखण करीत होते. मंदिराची ग्रिल बंद होती, त्याला तोडण्याचा प्रयत्न केला तर कुत्रे भुंकू लागत. या भीतीने चोरांनी सर्व कुत्र्यांच्या जेवणात विष दिलं. सांगितलं जात आहे की, या घटनेदरम्यान सात कुत्रे हजर होते. चोरांनी सर्व कुत्र्यांची हत्या केली. यानंतर दरवाजा तोडून दानपेटीमध्ये असलेले सर्व पैसे चोरी केलं. हे ही वाचा- बंदूक चेहऱ्याजवळ नेत बॅरल करीत होता साफ; अचानक गोळी सुटली आणि… मंदिराचा दरवाजा तोडून त्यांची पैसे चोरी केले. या घटनेनंतर लोकांनी संताप व्यक्त केला. लोकांनी ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचं सांगितलं. याशिवा मृत कुत्र्यांचं पोस्टमार्टम करण्याची मागणी केली जात आहे. स्थानिकांनी चोरांच्या अटकेची मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.