चंदीगड, 29 जानेवारी : हरियाणातील (Haryana News) बहादुरगढमध्ये एका व्यक्तीचा गोळी लागल्यामुळे मृत्यू (Man dies after being shot ) झाला आहे. ही गोळी त्याच्या स्वत:च्या परवानाधारक बंदुकीतून चालवण्यात आली होती. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र कुटुंबीयांच्या जबाबानंतर पोलिसांनी सामान्य कारवाई केली आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, गोळी बंदुकीची साफसफाई (bullet fired while cleaning licensed revolver) करताना सुटली. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सामान्य कारवाई करीत मृतदेह पोस्टमार्टमनंतर कुटुंबीयांना सोपवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहादूरगडातील गाव लोवा खुर्द राजीव (40) दररोजप्रमाणे शनिवारी सकाळी उठला. काही वेळानंतर त्याच्या खोलीतून गोळीचा आवाज ऐकू आला. कुटुंबीय धावत त्याच्या खोलीच्या दिशेने गेले. त्यांनी खोलीत पाहिलं तर राजीव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सोबतच शेजारी त्याची बंदूकही होती. कुटुंबीयांनी तातडीने त्याला बहादूरगडमधील एका खासगी रुग्णालयात नेलं. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सूचना मिळताच पोलीसदेखील रुग्णालयात पोहोचले आणि राजीवचा मृतदेह ताब्यात घेतला. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं वाटत होतं. हे ही वाचा- 3 वर्षे Live-in मध्ये;लग्नाच्या 13 दिवसांपूर्वी तरुणीची आत्महत्या, कुटुंब हादरलं यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला. तेव्हा कळालं की, राजीव सकाळी उठल्यानंतर आपली परवानाधारक बंदूर साफ करीक होता. तेव्हा अचानक बंदुकीतून गोळी झाडली गेली. गोळी राजीवच्या कपाळावरच लागली. पोलिसांनी कुटुंबीयांच्या जबाबानंतर कारवाई करीत मृतदेहाचं पोस्टमार्टम केल्यानंतर कुटुंबीयांना सोपवलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी राजीवच्या घराशेजारी राहणाऱ्यांसोबतही बातचीत केली होती.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







