पिंपरी, 23 जानेवारी: मागील काही काळापासून पुण्यासह (Pune) नजीकच्या पिंपरी (Pimpri) परिसरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दोनच दिवसांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या (Crushed head with stone) करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाई करून देखील गुन्हेगारांना जराही भीती राहिली नाही. अशात पिंपरीत एका तडीपार गुंडाने तर हद्दच केली आहे. त्याने कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की करत, धमकी दिली (criminal beat police and threat to death) आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार असं अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचं नाव आहे. आरोपी चांड्या हा पिंपरी परिसरातील मिलिंद नगर येथील रहिवासी आहे. तो एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी चांड्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलं होतं. पण पोलिसांच्या आदेशाचा भंग करत तो शहरातच वावरत होता. तसेच स्वत:जवळ कोयता बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. हेही वाचा- पुण्यात नामांकित कंपनीच्या महिला मॅनेजरवर कारमध्ये रेप, मग गाठला विकृतीचा कळस याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर, सांगवी पोलीस सराईत गुन्हेगार चांड्यावर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपीनं पोलिसांनाच धक्काबुक्की केली आहे. एवढंच नव्हे तर, ‘मला पकडायला येऊन तुम्ही चूक करताय, माझी वेळ आल्यावर तुम्हाला दाखवतो, मी कोण आहे ते’ अशी धमकी देखील दिली आहे. पोलिसांच्या अंगावर धावून गेल्यानंतर पोलीस पथकाने तडीपार गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत. हेही वाचा- पिंपरी: पतीच्या निधनानंतर दिराने दाखवला खरा रंग, वहिनीच्या घरात बसवला CCTV अन्.. पोलिसांनी पिंपरीगाव परिसरातील वैभवनगर परिसरातून आरोपीला अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून एक लोखंडी कोयता देखील जप्त केला आहे. तडीपार गुंडानेच पोलिसांना दमदाटी करत अंगावर धावून जाण्याचा प्रकार केल्याने, परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची पुढील कारवाई सांगवी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.