Home /News /pune /

पुण्यात नामांकित कंपनीच्या महिला मॅनेजरवर कारमध्ये बलात्कार, मग गाठला विकृतीचा कळस

पुण्यात नामांकित कंपनीच्या महिला मॅनेजरवर कारमध्ये बलात्कार, मग गाठला विकृतीचा कळस

Rape in Pune: एका नामांकित ई- कॉमर्स कंपनीत मॅनेजर पदावर काम करणाऱ्या उच्चशिक्षित महिलेवर कारमध्ये बलात्कार (Woman manager rape in car)झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी (Pimpri) परिसरात उघडकीस आली आहे.

    पुणे, 23 जानेवारी: एका नामांकित ई- कॉमर्स कंपनीत मॅनेजर पदावर काम करणाऱ्या उच्चशिक्षित महिलेवर कारमध्ये बलात्कार (Woman manager rape in car)झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune) पिंपरी (Pimpri) परिसरात उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले आहेत. एवढेच नव्हे तर त्याने नवीन बिझनेस सुरू करण्याच्या नावाखाली पीडित महिलेकडून 8 लाख रुपये घेऊन तिची फसवणूक (8 lakh rs fraud ) केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. आश्विक शुक्ला असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तो पुण्यातील बालेवाडी परिसरातील रहिवासी आहे. तर 30 वर्षीय पीडित महिलेनं याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी शुक्ला यांची ओळख एका मेट्रिमोनिअल साइटवर झाली होती. आरोपीनं 'सेन्ट्रल मिनिस्ट्री ऑफ अॅग्रीकल्चर फार्मर वेलफेअर' येथे डायरेक्टर म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं होतं. तसेच आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून पीडितेचा विश्वास संपादन केला होता. हेही वाचा-मुंबई हादरली, 19 वर्षीय तरुणीवर गँगरेप, 2 अल्पवयीन मुलं ताब्यात दरम्यान आरोपीनं माझ्याकडे एक बिझनेस प्लॅन आहे. कस्टममधून आलेल्या वस्तू कमी किमतीत घेऊन त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करायचा अशी बतावणी केली फिर्यादीकडे केली होती. हा बिझनेस सुरू करण्यासाठी 40 लाख रुपयांची आवश्यकता आहे. माझ्याकडे सध्या तीस लाख रुपये आहेत. व्यावसायासाठी आणखी दहा लाखांची आवश्यकता असल्याचं आरोपीनं फिर्यादीकडे सांगितलं आणि दहा लाखांची मागणी फिर्यादी महिलेकडं केली. आरोपीच्या बतावणीला बळी पडून पीडित तरुणीनं आठ लाख रुपये आरोपीला दिले. हेही वाचा-अकोला: रक्षकच बनले भक्षक; पोलीस कोठडीत सराफा व्यापाऱ्यावर अनैसर्गिक अत्याचार दरम्यान आरोपीनं पीडित महिलेला रहाटणी तसेच वाकड परिसरात घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. एवढंच नव्हे तर आरोपीनं एका जीपमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. यानंतर विकृतीचा कळस गाठत आरोपीनं पीडितेला वाकडमधील एका हॉटेलच्या पाठीमागे घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर पीडितेनं आरोपीकडे आठ लाख रुपये परत मागितले असता, त्याने पैसे परत न करता पीडितेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह फसवणुकीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Rape

    पुढील बातम्या