जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पती अघोरी तर पत्नी चोर..! उच्चशिक्षित जोडप्याचे एकमेकांवर गंभीर आरोप

पती अघोरी तर पत्नी चोर..! उच्चशिक्षित जोडप्याचे एकमेकांवर गंभीर आरोप

पती अघोरी तर पत्नी चोर..! उच्चशिक्षित जोडप्याचे एकमेकांवर गंभीर आरोप

प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि त्यांची मॅनेजर पत्नी यांच्यातील वाद एवढा वाढला आहे की, हे प्रकरण कोर्ट आणि पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

     मुंबई, 3 डिसेंबर :  प्रशासकीय सेवेतील (आरएएस) अधिकारी आणि त्यांची मॅनेजर पत्नी यांच्यातील वाद एवढा वाढला आहे की, हे प्रकरण कोर्ट आणि पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं आहे. अधिकारी पतीचा आरोप आहे की, पत्नीनं त्याचा फोटो एडिट करून त्याला अघोरी म्हटलं आहे. एवढेच नाही तर पत्नीनं सरकारी लॅपटॉपमधून 29 सरकारी कामांना परस्पर मंजुरीही दिली आहे. ‘दैनिक भास्कर’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण राजस्थानातील धौलपूर जिल्ह्यात घडलं आहे. जोधपूर महिला पोलीस स्टेशनमध्ये मॅनेजर पत्नीनं आपला हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर, आरएएस पतीच्या वतीनं पत्नीविरुद्ध 1 जानेवारी 2023 (रविवार) रोजी धौलपूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चौहान आणि शीना चौहान असं जोडप्याचं नाव आहे. चेतन चौहान हे धौलपूरमध्ये जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्त आहेत, तर त्यांची पत्नी शीना चौहान जोधपूरमधील बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत. दोघांचं 10 वर्षांपूर्वी लग्न झालं असून दोघांना नऊ वर्षांची मुलगी आहे. उधारीचे पैसे देऊ शकत नव्हता म्हणून पत्नीला म्हणाला…, मित्रानेही साधला तो डाव काय आहे प्रकरण? गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. चेतन यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितलं आहे की, त्याच्या पत्नीनं त्यांच्या मोबाईलमधून स्मशानभूमीतील काही फोटो घेतले आणि ते एडिट केले. हे फोटो वर्षभरापूर्वीचे आहेत जेव्हा चेतन यांच्या सासूचं निधन झालं होतं. शीनानं हे फोटो एडिट केले आणि चेतन यांच्यावर अघोरी असल्याचा आरोप केला. तसेच चेतन यांनी पत्नीवर लॅपटॉप चोरीचाही गुन्हा दाखल केला आहे. आरएएस अधिकाऱ्यानं पत्नी, मेहुणी आणि मामे सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाद झाल्यानंतर पत्नीनं 5 मे 2021 रोजी त्यांच्या सरकारी निवासस्थानातून सरकारी लॅपटॉप चोरला, असं चेतन चौहान यांचं म्हणणं आहे. तरुणी प्रेमात झाली आंधळी, बॉयफ्रेंडसाठी स्वत:च्या आईसोबत केलं भयानक कांड लॅपटॉप परत आणण्यासाठी 14 ऑगस्ट 2022 रोजी नरेगा बाबूला जोधपूरला पाठवण्यात आलं. पण, चौहान यांच्या पत्नीनं नकार दिला. यानंतर त्यांनी 19 नोव्हेंबर 2022 रोजी पत्नीला पत्र लिहिलं आणि 26 नोव्हेंबर 2022 रोजी ईमेलद्वारे पत्नीला लॅपटॉप परत करण्यास सांगितलं. पत्नीनं लॅपटॉप परत न करता, त्याचा वापर बहीण मीनू शंकर आणि मामा संजय व्यास शंकर यांच्यासोबत मिळून 29 सरकारी कामांना मंजूरी दिली. असं करून सासरची मंडळी आपल्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत होती, असा आरोप अधिकारी चौहान यांनी केला आहे. चौहान म्हणाले की, जेव्हा त्यांच्याकडे या कामांच्या फायली पोहोचल्या तेव्हा त्यांच्या पत्नीकडे असलेल्या लॅपटॉपवरून 29 कामांना मंजुरी मिळाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी 23 डिसेंबर रोजी एका पत्राच्या माध्यमातून सर्व कामं रद्द करण्याचे आदेश दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चौहान यांनी सांगितलं की, त्यांच्या सासू निधी शंकर यांचं 3 मे 2021 रोजी धौलपूर येथे निधन झालं होतं. धौलपूरमधील मुक्तिधाम येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अंत्यसंस्कारानंतर दोन वेळा त्यांच्या चितेसमोर बसून चौहान यांना श्रद्धांजली वाहिली होती. यानंतर त्यांनी घरी दिवा लावून सासूसाठी प्रार्थना केली होती. पत्नी, मेहुणी आणि मामे सासऱ्यांनी या प्रसंगाचे फोटो काढले. ते एडिट करून सोशल मीडियावर इतर नातेवाईकांना पाठवले. पत्नी आणि तिच्या माहेरची मंडळी चौहान यांना अघोरी साधू म्हणत आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    शीना चौहान यांनी मात्र, आपल्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, पतीने नोव्हेंबर महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. यानंतर ते अधिकृत पदाचा गैरवापर करून त्यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत, असा दावा केला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात