जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आईच्या प्रेमाने मृत्युच्या जबड्यातुन लेकाला काढलं बाहेर; मोबाईलच्या रिंगने असं मिळालं जीवदान

आईच्या प्रेमाने मृत्युच्या जबड्यातुन लेकाला काढलं बाहेर; मोबाईलच्या रिंगने असं मिळालं जीवदान

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

आपल्या मुलासाठी आई काहीही करू शकते, हे आपण अनेकदा ऐकतो-पाहतो-अनुभवतो. मुलं कितीही मोठी झाली, तरी आईला नेहमी त्यांची काळजी असते. इंदूरमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला आईच्या अशाच काळजीमुळे आणि सतर्कतेमुळे पुन्हा जीवदान मिळालं आहे.

  • -MIN READ Local18 Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 2 फेब्रुवारी: आपल्या मुलासाठी आई काहीही करू शकते, हे आपण अनेकदा ऐकतो-पाहतो-अनुभवतो. मुलं कितीही मोठी झाली, तरी आईला नेहमी त्यांची काळजी असते. इंदूरमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला आईच्या अशाच काळजीमुळे आणि सतर्कतेमुळे पुन्हा जीवदान मिळालं आहे. या प्रकरणामध्ये शेवटच्या क्षणी मोबाइल वाजला नसता तर कदाचित आईदेखील काहीही करू शकली नसती. मध्य प्रदेशातल्या इंदूरमधील 20 वर्षांच्या अरविंदने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली त्या दिवशी तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता. घरी परतल्यानंतर त्याची आई उर्मिला यांनी त्याला जेवण आणि चहा दिला. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला.थोड्या वेळानं त्याचा मोबाइल वाजल्याचा आवाज येत होता; पण बराच वेळ फोन वाजूनही त्यानं उचलला नाही, हे आई उर्मिला यांच्या लक्षात आलं. अरविंदने खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता. उर्मिला यांनी खिडकीतून डोकावलं असता त्याना अरविंद छपराला लटकलेल्या अवस्थेत दिसला. हे बघून त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा मदतीला आलेल्या शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून अरविंदला बाहेर काढलं. **(हे वाचा:** मृतदेहही असतो ‘जिवंत’; तुम्हाला माहिती नसतील असे मृत्यूनंतरचे Shocking Facts ) अत्यवस्थ स्थितीत असलेल्या अरविंदला उपचारासाठी एमवाय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. साडीचा फास बसल्यामुळे त्याच्या गळ्यातली शीर दाबली गेली आहे. त्यामुळे त्याला पुढच्या उपचारांसाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. अरविंदचा मोबाइल लॉक असल्याने घटना घडली त्या वेळी त्याला कोणाचा कॉल येत होता, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. सध्या तो काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही. त्याचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांना पुढच्या तपासात मदत होण्याची शक्यता आहे. त्यानं आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचाही खुलासा होईल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    दरम्यान, आपलं मानसिक आरोग्य हे आपल्या एकूण आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण मानसिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या कसं वावरू शकतो, हे आपल्या मानसिक आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असतं. मानसिक आरोग्य ठीक नसेल तर व्यक्ती कधी-कधी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलते. अरविंदच्या बाबतीत असंच काहीसं झालं असावं, असा अंदाज आहे. नैराश्यातून आत्महत्येचा विचार मनात आल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे. कदाचित या संवादातून मार्ग निघू शकतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात