मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PAK vs SA: फखर जमानच्या रन आऊटमुळे वाद, पाहा 'fake fielding' चे नियम

PAK vs SA: फखर जमानच्या रन आऊटमुळे वाद, पाहा 'fake fielding' चे नियम

पाकिस्तानचा बॅट्समन फखर झमान (Fakhar Zaman) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa vs Pakistan) दुसऱ्या वनडेमध्ये वादग्रस्त पद्धतीने रन आऊट झाला. क्विंटन डिकॉकने (Quinton De Kock) केलेल्या फेक फिल्डिंगमुळे (Fake Fielding) फखर झमानला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 एप्रिल : पाकिस्तानचा बॅट्समन फखर झमान (Fakhar Zaman) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa vs Pakistan) दुसऱ्या वनडेमध्ये वादग्रस्त पद्धतीने रन आऊट झाला. क्विंटन डिकॉकने (Quinton De Kock) केलेल्या फेक फिल्डिंगमुळे (Fake Fielding) फखर झमानला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. फखरने या सामन्यात 193 रनची खेळी केली, पण तो टीमला जिंकवू शकला नाही. पाकिस्तानचा या सामन्यात 17 रननी पराभव झाला.

मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 31 रनची गरज होती, तेव्हा फखर जमान मैदानात होता. लुंडी एनगिडीने शेवटच्या ओव्हरमध्ये डीप लॉन्ग ऑनला उभ्या असलेल्या एडम मार्करमने बॉल थ्रो केला, त्यावेळी क्विंटन डिकॉकने बॉल पकडायच्या आधी फखर जमानकडे बघून नॉन-स्ट्राईकरच्या दिशेने इशारा केला. डिकॉकच्या इशाऱ्यानंतर फखरने मागे वळून बघितलं, त्यामुळे फखरची धावण्याची गती कमी झाली, त्यातच बॉल स्टम्पला लागल्यामुळे फखर रन आऊट झाला.

क्विंटन डिकॉकच्या या इशाऱ्यानंतर सोशल मीडियावर फेक फिल्डिंग आणि चीटिंग आणि याबाबतच्या नियमांबाबत चर्चा सुरू झाली.

फेक फिल्डिंगचे नियम

41.5 च्या नियमांनुसार फेक फिल्डिंग म्हणजे जेव्हा एखादा फिल्डर जाणूनबुजून आपल्या शब्दांनी किंवा इशाऱ्याने बॅट्समनचं लक्ष विचलित करतो. नियम 41.5.2 नुसार मैदानातल्या दोन्ही अंपायरनी अशाप्रकारे खेळाडूचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न मुद्दाम केला गेला आहे का? हे निश्चित करणं आहे.

फिल्डरकडून जर अशापद्धतीने मुद्दाम बॅट्समनचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला गेल्याचं अंपायरच्या लक्षात आलं तर आऊट झालेल्या खेळाडूला अंपायर नॉट आऊट देऊ शकतो. तसंच दंड म्हणून बॅटिंग करणाऱ्या टीमला 5 रन अतिरिक्तही दिल्या जातात.

पाकिस्तान-दक्षिण आफ्रिकेतल्या दुसऱ्या वनडेमध्ये जर डिकॉकने जाणूनबुजून फखरचं लक्ष विचलित केल्याचं अंपायरने मान्य केलं असतं, तर पाकिस्तानला त्यांनी धावलेल्या 2 रन आणि पेनल्टीच्या 5 रन अशा एकूण 7 रन मिळाल्या असत्या.

फखरला या पद्धतीनं आऊट केल्याबद्दल आयसीसीनं (ICC) दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही खेळाडूंवर दंडात्मक कारवाई केली आहे. आयसीसीनं क्विंटन डि कॉकची 75 टक्के तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाची 20 टक्के मॅच फिस कापण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा विजय

या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा (92), क्विंटन डिकॉक (80), वॅनडर डुसेन (60) आणि डेविड मिलर (50*) यांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने 341 रनपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना फखर जमानने 193 रनची खेळी केली, पण पाकिस्तानला 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 324 रनच करता आल्या. फखरने त्याच्या खेळीमध्ये 155 बॉलमध्ये 18 फोर आणि 10 सिक्स मारले. तीन वनडे मॅचची ही सीरिज आता 1-1 ने बरोबरीत आहे. पाकिस्तानने सेन्च्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये तीन विकेटने विजय मिळवला होता. आता तिसरी वनडे 7 एप्रिलला होणार आहे.

First published:

Tags: Fake, Icc, Pakistan, Quinton de kock, South africa, Sports