भोपाळ, 2 जानेवारी: निष्काळजीपणे गाडी (Bus) चालवत 22 जणांच्या मृत्यूला (Death of 22 passengers) कारणीभूत ठरलेल्या ड्रायव्हरला (Driver) न्यायालयाने तब्बल 190 वर्षांची शिक्षा (190 year punishment) सुनावली आहे. बेदरकारपणे गाडी चालवणे, प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे, प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणे यासारख्या विविध गुन्ह्यांसाठी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत अपघाताच्या गुन्ह्यात झालेली कदाचित ही सर्वाधिक शिक्षा असल्याचं सांगितलं जात आहे.
काय आहे प्रकरण
मध्यप्रदेशात 4 मे 2015 या दिवशी हा भीषण अपघात झाला होता. बसचा चालक शमशुद्दीन 32 सीटर ट्रॅव्हलमधून प्रवाशांना घेऊन चालला होता. बस जेव्हा पन्ना जिल्ह्यातील पांडव कड्यापाशी आली, तेव्हा बसचालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली. काय घडतंय हे कळण्यापूर्वी प्रवाशांना जबर जखमा झाल्या होत्या आणि त्यातून सावरण्याची संधीच प्रवाशांना मिळाली नाही.
बसने घेतला पेट
दरीत कोसळल्यानंतर बसने काही क्षणातच पेट घेतला. बस कोसळल्यामुळे अगोदरच जखमी झालेले प्रवासी जागेवरून उठूही शकत नव्हते. त्यात बसला आग लागल्यामुळे स्वतःचं संरक्षणही त्यांना करता आलं नाही. बस पलटली होती आणि पेटली होती. त्यामुळे या आगीत 22 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी ड्रायव्हरला दोषी धरण्यात आलं. ड्रायव्हर या घटनेतून वाचला असला तरी त्याला त्याचं संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावं लागणार आहे.
हे वाचा- गर्लफ्रेंड सुंदर असल्याने सोडायला लावली नोकरी; तिला आनंदी ठेवायला करतो हे काम
अशी सुनावली शिक्षा
मध्यप्रदेशमधील सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सहा वर्ष सुरु होती. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी चालकाला दोषी धरण्यात आलं आहे. प्रत्येकाच्या मृत्यूची वेगळी शिक्षा चालकाला सुनावण्यात आली आहे. त्यामुळे सर्व गुन्ह्यांसाठी एकत्रितपणे झालेली शिक्षा ही 190 आहे. तर या गाडीचा मालक ज्ञानेंद्र पांडेय यालादेखील कोर्टानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Death, Madhya pradesh, Private bus