मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /रेल्वेनं तुकडे केले तरी सोडली नाही साथ, प्रेमीयुगुलांचे मृतदेह पाहून गावकरी हळहळले

रेल्वेनं तुकडे केले तरी सोडली नाही साथ, प्रेमीयुगुलांचे मृतदेह पाहून गावकरी हळहळले

प्रेमी युगुलाने एकमेकांचा हात धरून रेल्वे रूळावर उडी मारून आत्महत्या केली.

प्रेमी युगुलाने एकमेकांचा हात धरून रेल्वे रूळावर उडी मारून आत्महत्या केली.

प्रेमी युगुलाने एकमेकांचा हात धरून रेल्वे रूळावर उडी मारून आत्महत्या केली.

  • Local18
  • Last Updated :
  • West Bengal, India

परगणा 15 मार्च : पश्चिम बंगालमधील अशोकनगर हाबरा रेल्वे मार्गादरम्यान बटाला जंक्शन येथे पहाटे एका प्रेमी युगुलाने एकमेकांचा हात धरून रेल्वे रूळावर उडी मारून आत्महत्या केली. ते एकमेकांवर प्रेम करत होते दरम्यान काही दिवसांपूर्वी लग्नही केले होते. परंतु घरच्यांनी याला परवानगी न दिल्याने संबंध न स्वीकारल्याने ही आत्महत्या असल्याचे समजते. अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मेसेज टाकला होता. यामध्ये मुलीने लिहले आहे की, वडिल आईवर मानसिक छळ करत असल्याची तक्रार केली आहे.

आत्महत्या केलेल्या मुलीला 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी चार महिने बाकी असल्याने लग्नाच्या निर्णयावरून दोन्ही घरांमध्ये तणाव निर्माण झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या दाम्पत्याचा मृतदेह रेल्वे रुळावरून सापडल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. 

नवऱ्यासमोरच महिला प्रवाशासोबत....; धावत्या ट्रेनमध्ये टीसीचं लज्जास्पद कृत्य

बनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सकाळची ट्रेन जात असताना या जोडप्याने रेल्वेसमोर हातात हात घेत आत्महत्या केल्याचे स्थानिकांनी माहिती दिली. अशोकनगर कल्याणगड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील सहा पुकुर परिसरात 22 वर्षीय तुषार दास आणि 17 वर्षीय मौमिता मित्रा यांची घरे आहेत.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी पळून जाऊन 22 तारखेला लग्न केले. हे नाते मुलीच्या घरच्यांनी मान्य केले नसल्याची मुलाची तक्रार आहे. दुसरीकडे, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या घरच्यांकडून मुलाच्या घरच्यांविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दोघांनी पळून जाऊन लग्न केले असले, तरी मुलगी प्रौढ नसल्याने या जोडप्याला पोलिसांच्या त्रासाची भीती वाटली. ताण सहन न झाल्याने त्यांनी हा मार्ग निवडला असावा, असा अंदाज नातेवाईक आणि शेजाऱ्यांचा आहे.

शॉपिंगला गेला नवरा, बायकोने उचललं धक्कादायक पाऊल; पती घरी परतताच...

आयुष्य संपवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ मेसेज पोस्ट करून तिच्या पालकांची तक्रार केली. त्यानंतर ही घटना घडली. दरम्यान दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या दाम्पत्याच्या धक्कादायक निर्णयाने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. हाबरा आणि अशोकनगर पोलिस ठाण्याचा मोठा पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Suicide, West bangal