मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /कोरोनामुळे दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा मृत्यू; तिसऱ्याची प्रकृती गंभीर, उपचारासाठी पोलिसांनी ठेवली ही अट

कोरोनामुळे दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा मृत्यू; तिसऱ्याची प्रकृती गंभीर, उपचारासाठी पोलिसांनी ठेवली ही अट

त्याच्यावर सरकारने 25 लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं आहे. याशिवाय अनेक मोठे नक्षली कोरोनाबाधित आहेत.

त्याच्यावर सरकारने 25 लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं आहे. याशिवाय अनेक मोठे नक्षली कोरोनाबाधित आहेत.

त्याच्यावर सरकारने 25 लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं आहे. याशिवाय अनेक मोठे नक्षली कोरोनाबाधित आहेत.

  रायपूर, 24 जून: कोरोना (Corona) महामारीचे संकट नक्षलवाद्यांवर (Naxalite) गडद होताना दिसत आहे. बस्तरमध्ये अनेक नक्षली कारवाया करणारा खतरनाक माओवादी माडवी हिडमा (Madvi Hidma) यास कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बस्तरमधील जंगलात त्याची कोरोनाविरुध्द लढाई सुरु असल्याचे दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

  हिडमा हा माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा (DKSZCM) सदस्य असून, त्याच्यावर सरकारने 25 लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं आहे. याबाबत बस्तरचे पोलिस महानिरीक्षक (IG) सुंदरराज यांनी यास दुजोरा देताना सांगितले की हिडमाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून तो आजारी आहे. हिडमा व्यतिरिक्त अनेक मोठे नक्षली कोरोनाबाधित आहेत. हिडमासह या सर्वांनी शरणागती पत्करली तर आम्ही त्यांच्यावर वैद्यकिय उपचार (Medical Treatment) करु.

  कोण आहे माडवी हिडमा

  बस्तर जिल्ह्यातील (Bastar) पूवर्ती गावचा रहिवासी असलेला माडवी हिडमा हा गावातीलच प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. त्यावेळी या भागात सक्रिय असलेला माओवादी बदरन्नाने हिडमा याचे वर्तन पाहून नक्षलवाद्यांच्या बाल संघममध्ये भरती केले. हिडमाचे पुढील शिक्षण नक्षली शाळेत झाले. हिडमाची पिळदार शरीरयष्टी पाहून नक्षलींनी त्याला एलओएस ग्रुपमध्ये सामील करुन घेतले. हिडमाने आखलेल्या योजनांमुळे नक्षलवाद्यांना मोठे यश मिळाले. तो नारायणपूर, विजापूर आणि गडचिरोली भागात अनेक वर्षे सक्रिय होता. त्याला मोठ्या नक्षली नेत्यांनी कोटा एरिया कमिटीच्या जॉईंट प्लाटून चा कमांडर बनवले. त्याने 2007 ते 2021 या कालावधीत मोठ्या नक्षली कारवाया केल्या. सध्या हिडमा नक्षलींच्या मिल्ट्री बटालियन नंबर 1चा कमांडर आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य आहे.

  या मोठ्या घटनांचा मास्टर माईंड

  बस्तरमध्ये अनेक मोठ्या नक्षली कारवाया झाल्या. यात ताडमेटला येथील घटनेत 76 जवान, रानीबोदली येथील घटनेत 55 जवान, बुर्कापालमध्ये 25 जवान आणि टेकलगुडामध्ये 22 जवान शहीद झाले होते. महत्वाची बाब म्हणजे पूवर्ती गावातील रहिवासी आणि 25 लाखांचा इनाम असलेला नक्षली हाडमा या घटनांचा मास्टरमाईंड (Mastermind) होता आणि या कारवायांचे त्याने नेतृत्व केले होते.

  हे ही वाचा-घरकुलाच्या लाभात डल्ला मारणाऱ्यांना अद्दल; उपसरपंचासह तिघे ACB च्या जाळ्यात

  हिडमावर पोलिसांची नजर

  तेलंगणातील कोत्तागुडमचे एसपी सुनील दत्त यांनी सांगितले की हिडमा कोरोनाबाधित असल्याला दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे छत्तीसगड आणि तेलंगणा राज्य पोलिस त्याच्यावर करडी नजर ठेवून आहेत. हिडमाने शरणागती पत्करावी यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. जर हिडमाने शरणागती पत्करली तर बस्तर आणि तेलंगणातील माओवाद बॅकफूटवर जाईल.

  हिडमाला आहे वैद्यकिय उपचारांची गरज

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित हिडमाला सध्या औषधाची गरज आहे. काही दिवसांपूर्वी विजापूर पोलिसांनी नक्षलींच्या पुरवठा पथकातील 2 सदस्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर औषधे, सॅनिटायझर, मास्कचा साठा जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही औषधे माओवादी पुनेम याने मागवली होती आणि तेथून ती हिडमापर्यंत पोहोचविण्यात येणार होती.

  दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे हे सदस्य आहेत आजारी

  खतरनाक माओवादी हिडमा व्यतिरिक्त दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य विकास आणि महिला माओवादी सुजाता हे देखील कोरोनाबाधित आहेत. या दोघांवरही अनुक्रमे 25-25 लाखांचे बक्षीस जाहिर झाले आहे. 40 लाखांचा बक्षीस जाहिर असलेला माओवादी हरिभूषण आणि 8 लाखांचे बक्षीस असलेला कट्टी मोहन राव यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 10 नक्षलवादी मृत्यूमुखी पडलेले आहेत. तर अनेक मोठे नक्षलवादी नेते कोरोनाशी झुंज देत आहेत.

  First published:

  Tags: Chattisgarh, Coronavirus cases, Naxal Attack