Home /News /crime /

सेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं

सेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं

हे दोघेही लहानपणीचे मित्र आहे. दोघे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होते. जातानाही दोघांनी एकमेकांचा हात हातात धरला होता.

    ग्वाल्हेर, 26 जुलै : सेल्फीच्या वेडानं पुन्हा एकदा (Accident during selfie) दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यंदा हे वृत्त ग्वाल्हेरमधून आलं आहे. सेल्फीच्या वेडापायी दोन इंजिनिअरींगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा जीव गेला. ग्वाल्हेरच्या धूमेश्वर मंदिर दर्शनासाठी 10 तरुणांची टीम गेली होती. हे दोन तरुण त्यातच सामील होते. मात्र या दरम्यान असं काही घडलं की, 10 पैकी केवळ 8 जणं घरी परतू शकले. (Selfie craze kills two engineering students one dies for another ) ग्वाल्हेरच्या दाल बाजार येथून तरुणांची एक टीम रविवारी दुपारी पिकनिकसाठी धुमेश्वर मंदिरात गेले होते. येथे किशन होतवानी आणि कितांशु शाक्य यांचाही सामील होता. हे दोघे लहानपणीचे मित्र आहेत. आणि BE फायनल वर्षांला आहेत. धूमेश्वर मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी सर्वजण आंघोळ करण्यासाठी नदीत उतरले. आंघोळ करीत असताना किशन होतवानी सेल्फी घेऊ लागला. यात तो अचानक खोल पाण्यात जाऊ लागला आणि लाटांमध्ये वाहून लागला. किशनला पोहता येत नाही. त्याला वाचविण्यासाठी त्याचा सख्खा मित्र कितांशु शाक्यनेही देखील खोल पाण्यात उडी मारली. हे ही वाचा-लग्न करण्यासाठी मुंबईला पळून आले, प्रेयसीच्या भावाने प्रियकराला रेल्वेतून ढकलले हात पकडून पाण्यात गेले वाहून यानंतर दोघे एकमेकांचे हात पकडून लाटांसह वाहून गेल्याचे दिसले. काही वेळानंतर मात्र ते दिसेनासे झाले. यानंतर किशन आणि कितांशू यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. याशिवाय कंट्रोल रुमलाही या दुर्घटनेबाबत कळविण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच भितरवाल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तब्बल 2 तासांनंतर NDRF ची टीम पोहोचली. सिंध नदी गोताखोरांच्या मदतीने 24 तासांपर्यंत तरुणांचा शोध घेतला. त्यानंतर तब्बल 100 मीटर अंतरावर किशनचा मृतदेह सापडला. सोमवारी सायंकाळी घटनास्थळाच्या अर्धा किमी दूर कितांशूचा मृतेदह नदीतून बाहेर काढण्यात आला. किशन नदीत वाहून जात होता, यावेळी त्याला वाचविण्यासाठी कितांशूने नदीत उडी मारली होती. दोघांच्या मृतदेहावर मंगळवारी पोस्टमार्टम करण्यात येईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Death, Selfie

    पुढील बातम्या