जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai च्या आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीसाठी झाली होती अटक

Mumbai च्या आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीसाठी झाली होती अटक

Mumbai च्या आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीसाठी झाली होती अटक

दीड महिन्यांपूर्वी मोबाइल चोरीच्या आरोपाखाली तरुणाला अटक करण्यात आली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जानेवारी : Prisoner Suicide In Mumbai: मुंबईतील (Mumbai) सर्वात सुरक्षित आर्थर रोड (Arthur Road) जेलमध्ये आज सकाळी एका कैद्याने (Prisoner) आत्महत्या (Suicide) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलीस सूत्रांनी सांगितलं की, कैद्याचं नाव मोहम्मद हमिद शेख़ आहे. (Mumbai Police) अद्याप आत्महत्येचं कारण कळू शकलेलं नाही. तर दुसरीकडे हमिदचे भाऊ अनवर शेखने सांगितलं की, आज सकाळी पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी आले होते, त्यांनी सांगितलं की, हमिदची तब्येत बिघडली आहे. ज्यानंतर आम्ही तुरुंगात आलो तर कळालं की त्याने आत्महत्या केली आहे. (Prisoner commits suicide in Mumbai Arthur Road jail Arrested for mobile theft) हमिदच्या मित्रांनी सांगितलं की, जेल प्रशासनाने या बाबत तपास करावा. तुरुंगात अशा प्रकारची घटना कशी काय होऊ शकते. हमिदचा दुसरा भाऊ जावेद शेखने एबीपीशी बोलताना सांगितलं की, मला तुरुंगाच्या आत नेण्यात आलं होतं. आरोपीने अंथरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या गळ्याभोवती कपड्याचे निशाण दिसत होते. हे ही वाचा- गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी स्वत:च्याच हत्येचं रचलं कारस्थान; पोलीसही हैराण! जावेद शेखने सांगितलं की, पोलिसांनी त्याला खाली उतरवलं. मृत आरोपीच्या भावाने सांगितलं की, तो तणावात होता. याशिवाय घरातही कौटुंबिक समस्या सुरू होती. मात्र तो आत्महत्येसारखं पाऊल उचलेलं असं कधी वाटलं नव्हतं. हामिदच्या भावाने सांगितलं की, दीड महिन्यापूर्वी हमिदला मोबाइल चोरीच्या आरोपाखाली जेजे मार्ग पोलिसांनी अटक केली होती. ज्यानंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. हमिद एका इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात काम करीतहोता. या प्रकरणात तुरुंग प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात