पाटना, 20 जानेवारी : Boyfriend Girlfriend Story: बिहारमधून (Bihar News) एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका तरुणाला आपल्या प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी या लग्नास विरोध केला होता. यानंतर तरुणाने जे काही केलं ते पोलीसही हैराण झाले. तर एका तरुणाने आपल्याच हत्येचं (Crime News) कारस्थान रचलं.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पोलिसांना बिहारमधील छपरा भागातील एका गावात 22 वर्षीय तरुण मुन्ना शाह याच्या हत्येबाबात माहिती मिळाली होती. (Conspiracy of his own murder plotted to marry his girlfriend then the police were also shocked to know what happened)
तरुणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर तरुणाचा मृतदेहही गायब होता. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखळ करीत तरुणाचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बरेच दिवस पोलिसांना तरुणाचा मृतदेह सापडला नाही. शेवटी पोलिसांनी तरुणाचा मोबाइल ट्रॅक केला. यानंतर जे काही समोर आलं ते पाहून पोलीसही हैराण झाले.
पोलीस तीन दिवस कडाक्याची थंडीत गावभर तरुणाचा मृतदेह शोधत होते. यानंतर मोबाइल ट्रॅक केल्यानंतर महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली. तरुणाने प्रेयसी आणि आपल्या साथीदारांसह मिळून स्वत:च्याच हत्येचं कारस्थान रचलं होतं.
हे ही वाचा-संशयामुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या
तरुणाला केली अटक
यानंतर पोलिसांनी मोबाइल फोनच्या मदतीने तरुणाला अटक केलं. तरुणाची चौकशी केली असताना त्याने खरी बाब उघड केली. त्याने आपल्या प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं. मात्र मुन्ना शाहचे कुटुंबीय याला परवानगी देत नव्हते. त्यामुळे कुटुंबावर दबाव आणण्यासाठी त्याने हे सर्व कारस्थान रचलं. पोलिसांनी सांगितलं की, मुन्ना शाहने एक कार भाड्याने घेतली आणि ब्लड बँकेतून रक्त आणून ते रस्त्यात टाकलं आणि त्यानंतर तो गायब झाला. मात्र मोबाइल फोनमुळे तरुणाचं बिंग फुटलं. तरुणाने सांगितलं की, त्याचं प्रेयसीवर खूप प्रेम आहे आणि तो तिच्याशीच लग्न करू इच्छितो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Girlfriend, Marriage, Murder